All News

पेठ तालुक्यातील शिवशेत येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी रंगविल्या पणत्या

पेठ तालुक्यातील शिवशेत येथील दिव्यांग विद्यार्थ्यांनी रंगविल्या पणत्या


मि अविवेकाची काजळी फेडोनी विवेक दीप उजळी ते योगिया पाहे दिवाळी निरंतर ज्ञानेश्वर महाराजांनी दिवाळी सण हा आनंद देणारा आणि  दिव्याच्या माज्ञ्मातून आयुष्यातील प्रकाश वाढवणारा म्हणून सांगितला आहे.  


या पार्श्वभूमीवर पंचायत समिती पेठ गटशिक्षण अधिकारी श्रीमती सरोज जगताप यांच्या संकल्पनेतुन बुधवार दि.१६ रोजी पेठ तालुक्यातील शिवशेत येथे दिव्यांग विद्यार्थी पणती डेकोरेशन कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत  जोगमोडी बीटातील अध्ययन शैलीचा एक - एक विद्यार्थी असे एकूण 40 विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत एकूण 200 पणत्या रंगविल्या व त्यांचे प्रदर्शन ठेवत विक्री करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांचे चेहरी आनंदी दिसत होते आपण बनविलेल्या साहित्यातुन पैसे मिळतात त्याचबरोबर शिका व कमवा हा संदेश विद्यार्थ्यांपर्यत पोहचविता आला. दरम्यान विस्तार अधिकारी श्रीम.राठोड मडम,केंद्र प्रमुख श्री.वाणी सर,शिक्षक बळीराम धुम,दिलीप डगळे,हेमंत भोये,नितीन पठाडे,रवीशंकर रायफळे,दिनेश भरणे,जोगमोडी बीटातील शिक्षक तसेच दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी श्रीमती राठोड यांनी सर्वांना दिवाळी सणाच्या शुभेछ्या दिल्या.


Advertisement

test 4 test2 IBPS IBPS