All News

भाजपा कार्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांतीदिनी अभिवादन

भाजपा कार्यालयात जागतिक आदिवासी दिन व क्रांतीदिनी अभिवादन

नाशिक : दि ०९ ऑगस्ट : जागतिक आदिवासी दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे वसंतस्मृती कार्यालयात आदिवासी बांधवांचे जननायक बिरसा मुंडा यांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेस सुरेश खेताडे, प्रा.परशराम वाघेरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

बिरसांना सगळयांमध्ये मिळून मिसळून राहण्याची आवड होती त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क व समविचारी सहकार्याचे संघटन केले. बिरसांना आपल्या वडीलांचे सुगन मुंडाचे जबरदस्तीने धर्मांतरण केल्याबद्दल इंग्रजांचा मनस्वी राग येत असे त्यातच अशिक्षीत आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकविण्याचा विचार त्यांनी केला. स्वामी आनंद पांडे यांना त्यांनी गुरुस्थानी मानले होते. इ.स.1895 मध्ये बिरसा मुंडा यांनी इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात मोठा लढा उभारला अशी माहिती प्रा. परशराम वाघेरे यांनी दिली. तसेच आदिवासींच्या विकासासाठी भाजपा केंद्र सरकारांने विविध योजना आखल्या असून त्याचा लाभ समाजबांधवांनी घ्यावे,असे आवाहन ज्येष्ठ  नगरसेवक सुरेश खेताडे यांनी केले. तसेच बिरसा मुंडा यांच्या जीवनांचे अनेक पैलू सुरेश खेताडे यांनी उपस्थितांना सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय करीपुरे यांनी केले. आभारप्रदर्शन सुजाता करजगीकर यांनी केले.

यावेळी शहराध्यक्ष गिरीष पालवे, मध्य मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी, वसंत उशीर आदी पदाधिकारी उपस्थित होते. आदिवासी बांधवांसाठी मुंडा यांनी केलेल्या कार्याचा परिचय यांनी करून दिला.यावेळी मंगला खोटरे, लता राऊत, रामचंद्र राऊत, पांडूरंग खोटरे, डॉ.चंद्रशेखर नामपुरकर, संदीप गोसावी, सुनिल पांडे, समाधान कोलकर, जगन तुंबडे, अरुण शेंदुर्णीकर, देवेंद्र चुंभळे, नितीन कार्ले, दिपक सोनवणे आदि उपस्थित होते.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test2 Highclonoid Softec Pvt Ltd