All News

माध्यम प्रतिनिधिनसाठी ब्रह्माकुमारी मुख्यालयात महासंमेलनाचे आयोजन : नाशिकचा उत्स्फूर्त सहभाग

माध्यम प्रतिनिधिनसाठी ब्रह्माकुमारी मुख्यालयात महासंमेलनाचे आयोजन : नाशिकचा उत्स्फूर्त सहभाग

माध्यम प्रतिनिधिनसाठी ब्रह्माकुमारी मुख्यालयात महासंमेलनाचे आयोजन : नाशिकचा उत्स्फूर्त सहभाग


माउंट आबू/आबू रोड, येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या शांतिवन कॉम्प्लेक्स  मध्ये  अखिल भारतीय मीडिया संमेलना चे आयोजन दि. 20 ते 24 सप्टेंबर दरम्यान करण्यात आले. यात नाशिक येथून प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या विविध प्रसार माध्यम प्रतिनिधींनी  सहभाग घेतला.


     ' शांति आणि सद्भावना च्या स्थापनेसाठी  आध्यात्म - मध्यमांची भूमिका ' या विषयांवये आयोजित केलेल्या या संमेलनाच्या दीप प्रज्वलन प्रसंगी मीडिया इनिसिएटिव फॉर वैल्यूज चे राष्ट्रीय अध्यक्ष  प्रो. कमल दीक्षित, महाराष्ट्र वन चैनल चे कार्यकारी सम्पादक संदीप चौहान, इंडियन फेडरेशन ऑफ़ वर्किंग जर्नलिस्ट चे अध्यक्ष विक्रम राव, बंगलोर दूरदर्शन केंद्र च्या उपनिदेशक निर्मला सी यालीगर, ब्रह्मा कुमारीज़ चे महासचिव राजयोगी निर्वैर भाईजी, उत्तर प्रदेश विधान सभा चे सदस्य पूरण प्रकाश जी, मीडिया विंग आणि मल्टी मीडिया चे अध्यक्ष राजयोगी करुणा भाई आदि मान्यवर उपस्तित होते. ब्रह्मा कुमरीस शिक्षा प्रभाग च्या उपाध्यक्षा राजयोगिनी शीलू दीदी  यांनी योगाभ्यास करविला. राजयोगिनी चन्द्रकला बहन यांनी मंच चे संचालन केले.


   याप्रसंगी नाशिक येथून वक्ता म्हणून आमंत्रित माजी सनदी अधिकारी (IAS) बी. जी.  वाघ यांनी डायलॉग सत्रांत कार्यसंस्थेत कार्य करतांना अन्तरवैयक्तिक संबंधांचा  विकास कसा करवा याविषयी भाष्य केले. यात ते म्हणाले कि वाढत्या तंत्र विद्येत क्रांती झाल्या मुळे माणसाचा माणसाशी संपर्क न उरल्याने माणसाला एकाकीपण आले आहे, मानसिक आजारांमध्ये यामुळे वृद्धी झालेली दिसते. या साठी ब्रह्मा कुमारी संस्थेचा राजयोग मेडिटेशन विशेष सहकार्य करतो. तसेच त्यांनी ताओ व बौद्ध तत्वज्ञान यातील परस्पर संबंधाबाबत चर्चा केली. या वेळी माजी जिल्हा माहिती अधिकारी विजय पवार यांनीहि चर्चा सत्रात भाग घेऊन आपले विचार व्यक्त केले. नाशिक रेडिओ नमकीन चे राहुल श्रीवंश यांनी सादरिकरण केले.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test2 IBPS Highclonoid Softec Pvt Ltd