All News

येवला तालुक्यात परतीच्या पावसाने केले नुकसान

येवला तालुक्यात परतीच्या पावसाने केले नुकसान

येवला :  तालुक्यातील जवळपास सर्वच परिसरात परतीच्या पावसाने हातातोंडाशी आलेल्या खरीप हंगामातील शेतमालाची मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे यंदाची बळीराजाची दिवाळी अंधारातच गेली. 

पूर्व भागातील ममदापुर,देवदरी,खरवंडी, उंदिरवाडी ,
अंदरसुल,नगरसुल अशा अनेक भागात मोठ्या प्रमाणावर मका कांदा कपाशी बाजरीचे पीक घेतले जाते. मात्र परतीच्या पावसाने या परिसरातील शेत जमीन पूर्णता पाणीमय झाल्यामुळे पीक सडली असुन वर्षांपासून केलेली मेहनत वाया जाऊ लागल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. गेल्या पाच महिन्यांपासून पडणाऱ्या पावसाने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले या वर्षी चांगले पिकांचे उत्पादन होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती पण या सर्वांवर परतीच्या पावसाने पाणी फेरले आहे या पिकांसाठी औषध व खतांच्या मोठा खर्च झाला असुन शेतकरी कर्जाच्या खाईत बुडाला असून यातुन सावरण कठीण झाल असल्याच चित्र दिसत आहेत मका बाजरीच्या कणसाला मोड फुटले असुन शेतकरी वर्गाच्या पदरी निराशा आली आहे शासनाने या परिसरातील पिकांचे पंचनामा करून सहकार्य करावे अशी मागणी शेतकरी करत आहेत.

Advertisement

test2 IBPS IBPS test 4