All News

स्नुपिंगप्रकरणी सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करावी व श्वेतपत्रिका जाहीर करावी - जयंत पाटील

स्नुपिंगप्रकरणी सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करावी व श्वेतपत्रिका जाहीर करावी - जयंत पाटील

स्नुपिंगप्रकरणी सरकारने एसआयटीमार्फत चौकशी करावी व श्वेतपत्रिका जाहीर करावी - जयंत पाटील


मुंबई दि. ४ l स्नुपिंग प्रकरणी सरकारने एसआयटी स्थापन करावी. आणि सर्व प्रकरणाची श्वेतपत्रिका जाहीर करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

प्रसारमाध्यमांमध्ये स्नुपींगचा प्रकार सुरु आहे. इस्त्रायलमधील एनोसो कंपनीमार्फत देशातील काही लोकांचे माहिती काढली गेली आहे त्याच्या बातम्या जागतिक स्तरावर आल्या आहेत. हा प्रकार भारतात घडतोय ही चिंतेची बाब आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

फेसबुकने ४० लोकांची नावे उघड केली आहे. त्यामध्ये १४ लोक महाराष्ट्रातील आहेत. ही मर्यादीत यादी आहे. यापेक्षा जास्त माहिती असू शकते. पाळत ठेवण्याचे काम सुरू आहे. फेसबुकने याअगोदर उघड केली होती. याची माहिती केंद्रसरकारला मे महिन्यापासून होती. केंद्र सरकारला नावे कळवली आहेत तर ती प्रसारीत करावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली.

अशा स्वरूपाचे सॉफ्टवेअर वापरले. यासाठी ५ लाख डॉलर व ७० हजार डॉलर खर्च होतो हा खर्च भारतातल्या कुठल्या कंपनीने केला. केंद्र सरकारने कुणाला मान्यता दिली होती. कुणाच्या आदेशाने पाळत ठेवण्यात आली याची माहिती समोर आली पाहिजे असेही जयंत पाटील म्हणाले. 

महाराष्ट्रात दलित नेत्यांवर पाळत ठेवण्यात आली का, माहितीच्या आधारावर त्यांना नक्षलवादी ठरवण्यात आले का, कुणावर त्यातून मुद्दाम कारवाई करण्यात आली का याबाबतची माहिती पुढे येत आहे. 

पुर्वी पाळत ठेवण्यात येत होती एखाद्या उद्योगपतींवर मदत करावी म्हणून केली जात होती. आता घडत असलेले हे प्रकरण गंभीर आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न आहे. हे अतिक्रमण सरकार करत आहे अशी शंका येत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.

जगात अशा घटना घडल्या त्यावेळी सरकार पडलं होतं. राजीव गांधी यांच्या घराबाहेर पोलिस पाळत ठेवले. पाळत ठेवणं हे भारतात कधीही सहन केले नाही. याची जबाबदारी केंद्राची आहे.केंद्र सरकारने ही जबाबदारी टाळू नये रविशंकर यांनी तात्काळ खुलासा करावा. भूमिका जाहीर करावी आणि केंद्राने तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली. 

केंद्रसरकारने कुणावर पाळत ठेवली, पत्रकार, दलित नेते, सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, यांच्यावर पाळत ठेवली यामध्ये कुणाचा इंटरेस्ट आहे. याचा केंद्रसरकारने खुलासा करावा. ती नावे जाहीर करावी अन्यथा फेसबुकही जाहीर करेल हे नक्की असेही जयंत पाटील यांनी सांगितले. 

पत्रकार परिषदेला आमदार जितेंद्र आव्हाड, प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे उपस्थित होते.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test2 IBPS Highclonoid Softec Pvt Ltd