All News

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता दौडचे आयोजन

राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता दौडचे आयोजन

विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडुंचा सत्कार

नाशिक दि.31- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासन, नाशिक शहर पोलिस आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने  पोलीस कवायत मैदान येथे एकता दौडचे आयोजन करण्यात आले. यावेळी विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडुचा सत्कार करण्यात आला.

  सरदार वल्लभभाई पटेल यांचा जयंतीदिन ‘राष्ट्रीय एकता दिवस’ आणि माजी पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांचा पुण्यतिथी दिन ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने आयोजित  कार्यक्रमाला जिल्हाधिकारी सुरज मांढरे, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, पोलीस अधीक्षक आरती सिंह, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे, आंतरराष्ट्रीय खेळाडू मोनिका आथरे, संजिवनी जाधव, किसन तडवी, ताई बामणे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी   मांढरे आणि पोलिस आयुक्त नांगरे-पाटील यांनी  उपस्थितांना  एकतेची शपथ देऊन एकता दौडचा शुभारंभ केला. दौडमध्ये राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कारार्थी, युवा पुरस्कारार्थी, विविध क्रीडा संघटनांचे खेळाडू, पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था, विविध शासकिय कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. पोलीस कवायत मैदान, केटीएचएम महाविद्यालय, गंगापूर रोड, गंगापुर नाका, कॅनडा कॉर्नर, शरणपूर रोडमार्गे पोलीस कवायत मैदान येथे दौडचा समारोप करण्यात आला. 

तत्पूर्वी, नुकत्याच भारतीय कबड्डी संघाच्या प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या शैलजा जैन, आंतरराष्ट्रीय धावपटू मोनिका आथरे, संजीवनी जाधव, किसन तडवी, शूटिंगखेळाडू  जयश्री टोचे , विशेष नैपुण्य म्हणून जिल्ह्यातील राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त डाऊन्स सिंड्रोम जलतरणपटू स्वयम पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

***********

विभागीय आयुक्त कार्यालयात एकात्मतेची शपथ

विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय एकता दिवस आणि राष्ट्रीय संकल्प दिवसाच्या निमित्ताने विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाला उपायुक्त रघुनाथ गावडे, रमेश काळे, अर्जुन चिखले आदी उपस्थित होते.


Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam