All News

पंचवटीत अतिक्रमणे हटविली; मोहीम सुरू राहणार

पंचवटीत अतिक्रमणे हटविली; मोहीम सुरू राहणार

पंचवटी विभागातील मालेगांव स्टँड परिसरातील सीटीएस क्र. 5877 मधील सिध्दी टॉवर्स मधील वाहनतळाच्या जागेतील 1. दिशा व्हेज नॉनव्हेज चायनिज यांचे सु. 2.50 मी × 6.00 मी. मापाचे दुकान 2. सियान इंजिनीयर्स वर्क्स यांचे सु. 4.50 मी × 7.50 मी. मापाचे दुकान, 3.सियान रोलींग शटर्स यांचे सु. 9.00 मी × 3.00 मी. मापाचे दुकान 4. कोहली एंटरप्रायजेस यांचे सु. 3.00 मी × 7.00 मी. मापाचे दुकान 5. गुरुनानक ऑटोमोबाईल्स यांचे सु. 3.00 मी × 3.00 मी. मापाचे पक्कया स्वरुपाचे विटबांधकामात असलेले दुकाने हटविण्यात आले. 

        तसेच मालेगांव स्टँड येथील मनपा मालकीच्या पार्कींगच्या जागेतील आरक्षण क्र. 489 अ व क मधील न्यु पंजाब हॉटेल यांचे तळघरातील 20 × 20 मी. पत्र्याचे शेड, 10 × 5 मी. मापाचे पक्क्या स्वरुपाचे गाळे, 5 × 8 मी. मापाचे पक्क्या स्वरुपाचे शटर असलेले गाळे, लोखंडी कमान व जत्रा हॉटेल येथील महामार्गा लगत असलेल्या 2 पत्र्याचे दुकाने हटविण्यात आली.

यापूढे सहाही विभागांमध्ये ना-फेरीवाला क्षेत्र, सार्वजनिक रस्ते, फुटपाथ, चौक इ. ठिकाणी अतिक्रमणे करुन व्यवसाय करणारे भाजीविक्रेते, फळविक्रेते, हॉकर्स, टपरीधारक व इतर तत्सम व्यावसायिक यांचेविरुध्द अशाच प्रकारची कडक कारवाई करुन प्रसंगी पोलीस विभागात गुन्हे देखील दाखल करणेत येतील, याची सर्व संबंधीतांनी नोंद घ्यावी, असे आवाहन नाशिक मनपाने केले आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test2 test 4