All News

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई, दि. ११ ऑगस्ट : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघातून निवडून आलेले राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.


शिवसेना हा कष्टकरी शेतकरी, गोरगरीब जनतेच्या प्रश्नांची जाण असणारा पक्ष आहे. त्यामुळे शिवसेना विचारांशी आमचे विचार जुळत असल्यामुळे आणि उद्धव ठाकरे यांच्या प्रति असलेल्या निष्ठा आणि विश्वासामुळे शिवसेना पक्षात प्रवेश करत आहे,यापुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली माझ्या शेतकरी बांधव आणि गोरगरीब जनतेच्या हितासाठी सदैव कार्यरत राहील, असंही ट्विट करत शंकरराव गडाख यांनी सांगितलं आहे.

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam