All News

राज ठाकरे यांचे जिम चालकांना जिम सुरु करण्याचे आवाहन

राज ठाकरे यांचे जिम चालकांना जिम सुरु करण्याचे आवाहन

मुंबई, दि. ११ ऑगस्ट : राज्यात लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या जिम सुरू व्हाव्यात यासाठी बॉडी बिल्डर आणि जिम मालक संघटना पदाधिकारी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. सहा महिन्यांपासून बंद असणाऱ्या जिम पुन्हा सुरू व्हाव्यात या मागणीसंदर्भात त्यांनी यावेळी चर्चा केली.  यावेळी राज ठाकरे म्हणाले,'तुम्ही जिम सुरु करा, किती दिवस लॉकडाउनमध्ये काढणार आहात? असे सांगत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जिम चालकांना जिम सुरु करण्याचे आवाहन केले.
राज्य सरकारने अजूनही जिम चालकांना जिम सुरु करण्याची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे मागच्या काही दिवसांपासून या व्यवसायाशी संबंधित असलेले लोक राज्यात आंदोलन करत आहेत. 'केंद्र सांगतं जिम सुरु करा, विमानतळ सुरु करायला सांगितलं, राज्य म्हणतं आम्ही नाही करणार, मग राज्याला काही वेगळी अक्कल आहे का?' असा सवालही त्यांनी ठाकरे सरकारला विचारला आहे.

Advertisement

IBPS MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd IBPS