All News

नाशिकमधील सर्व साहित्यिक संस्थांची आज बैठक

नाशिकमधील सर्व साहित्यिक संस्थांची आज बैठक

नाशिक, दि. २२ जानेवारी : ९४वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक नगरीत होत आहे. संमेलन नाशिकलाच व्हावे यासाठी नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाने मागील वर्षीपासून प्रयत्न केले. लोकहितवादी मंडळाच्या माध्यमातून संमेलन होत आहे. संमेलन नाशिकमध्ये व्हावे यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करून यश मिळविले याबद्दल लोकहितवादी मंडळाचे पदाधिकाऱ्यांचा आज कौतुक सोहळा होणार आहे.  आज दि. २२ रोजी भावबंधन मंगल कार्यालय,हनुमानवाडी,मखमलाबाद रोड येथे सायंकाळी सहा वाजता कार्यक्रम होईल. 


सार्वजनिक वाचनालय (सावाना), कुसुमाग्रज प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद नाशिकरोड, नाशिक कवी, मराठी कथा लेखक संघ, संवाद, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ-नाशिक शाखा, कुसुमाग्रज साहित्यिक मंच, साहित्य कणा, काव्यमंच,नारायण सुर्वे कवी कट्टा, गिरणा गौरव परिवार, साहित्य,कला व व्यक्ती विकास मंच, विश्व मराठी परिषद, कुसुमाग्रज मराठी विचार मंच,अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, नाशिक साहित्य मंच,परिवर्त परिवार, व्यासपीठ परिवार, साहित्य रसिक मंडळ, सुर्योदय सर्वसमावेशक मंडळ, कादवा शिवार, इगतपुरी तालुका साहित्य मंडळ,सुभाष वाचनालय, पंचवटी वाचनालय, ज्ञानेश्वर वाचनालय, सुधीर फडके वाचनालय, सर्वात्मक वाचनालय या व इतर साहित्यिक संस्थांचे पदाधिकारी व काही निमंत्रित साहित्यिक उपस्थित रहाणार आहे. तरी या सोहळ्यास उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष बाळासाहेब मगर, कार्याध्यक्ष शरद पुराणिक, कार्यवाह सुभाष सबनीस, उपाध्यक्ष संतोष हुदलीकर,  उपाध्यक्ष अजय बिरारी, उपाध्यक्ष आर.के.सावे आदींनी केले आहे.

Advertisement

IBPS MahaExam IBPS test 4