All News

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक गावाची : पालकमंत्री छगन भुजबळ

ग्रामीण भागातील रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक गावाची : पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिक, दि.  4 जुलै : ग्रामीण भागात ज्या गावांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या शून्य झाली आहे, त्याठिकाणी पुन्हा रुग्णसंख्या वाढणार नाही यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवून ती शून्य कशी होईल याची जबाबदारी ही प्रत्येक गावाची असून त्यासाठी अधिक लक्ष देण्यात यावे, अशा सूचना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

आज येवला येथील शासकीय विश्रामगृहात येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व लसीकरण याबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. याबैठकीसाठी नगरपालिकेचे नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत सोनाग्रा, प्रांत अधिकारी सोपान कासार, तहसीलदार शरद घोरपडे, उपअभियंता उमेश पाटील, सागर चौधरी, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे,  येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या आरोग्य अधिकारी डॉ. शैलजा कृपास्वामी, गट विकास अधिकारी डॉ. उन्मेष देशमुख,  ग्रामीण पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, तालुका पोलीस निरीक्षक अनिल भवारी, येवला शहर पोलीस निरीक्षक संदीप कोळी, लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ,येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवारआदी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारांवर स्थिर झाली आहे. रुग्णसंख्या कमी होत नाही ही चिंतेची बाब असून ही शून्य होणे अतिशय गरजेचे आहे. ज्या ठिकाणी रुग्णसंख्या शून्य झाली आहे. त्याठिकाणी पुन्हा रुग्ण वाढणार नाही यासाठी काळजीपूर्वक नियोजन करण्यात यावे. तसेच कोरोनाच्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. गृहविलीगीकरणातील रुग्णांच्या दररोज घरी जाऊन तपासणी करण्यात येवून त्यांना घरी राहण्याची व्यवस्था नसेल तर त्यांना ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात यावे. जिल्ह्यातील ऑक्सिजन जनरेशन प्लँटचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. त्याचप्रमाणे लसीकरण मोहीम जलद गतीने राबविण्यात येवून त्यासाठी जनजागृती करण्यात यावी, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी सांगितले.


पीक कर्ज योजनेला एक महिन्याची मुदतवाढ

पावसाने ओढ दिल्याने पाणी टंचाई निर्माण झाली असून पाणी काळजीपूर्वक वापरण्यात यावे. दुबार पेरणीचे संकट येऊ नये म्हणून पाऊस पडत नाही तोपर्यंत पेरणी न करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना करावे. तसेच खते आणि बियाणांची टंचाई निर्माण होणार नाही यासाठी आवश्यक प्रमाणात साठा करण्यात यावा, अशा सूचना कृषी विभागास दिल्या आहेत.  त्याचप्रमाणे शेतकरी कर्ज वाटपाचा आढावा घेऊन लवकरात लवकर कर्जवाटप करण्याचे आदेश दिले असून यावेळी पीक कर्ज योजनेला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. 


सामाजिक न्याय विभागामार्फत आर्थिक मदतीचे वाटप

दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील अपघातात निधन झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना सामाजिक न्याय विभागामार्फत २० लाभार्थ्यांना प्रत्येकी रुपये २० हजारांच्या मानधनाचे वाटप पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

Advertisement

IBPS MahaExam IBPS test 4