All News

महाराष्ट्रात सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त धोकादायक

महाराष्ट्रात सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन जास्त धोकादायक

मुंबई, दि. २३ फेब्रुवारी :  महाराष्ट्रात सापडलेला कोरोना विषाणूचा उपप्रकार (नवीन स्ट्रेन) हा अत्यंत संसर्गजन्य आणि धोकादायक आहे. कोरोनाचा हा नवा उपप्रकार राज्यासाठी चिंतेचा आणि सरकारसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकतो.


महाराष्ट्रासह पाच राज्यांमध्ये कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. संपूर्ण लोकसंख्येपैकी 80 टक्के लोकांमध्ये अँटिबॉडीज म्हणजेच प्रतिजैविके  असणे गरजेचे आहे. त्याला हर्ड इम्युनिटी तयार झाली असे म्हणता येईल. या नव्या व्हेरिएंटमुळे अँटीबॉडी विकसित झालेल्या लोकांमध्ये पुन्हा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये जर पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाला, तर समजायचे की कोरोनाच्या या नव्या उपप्रकाराची लागण झाली आहे.


महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये अचानक गेल्या आठवड्याभरात कोरोना बधितांची संख्या वाढली आहे. या आणीबाणीच्या वेळी तीन कोटी आरोग्य सेवक आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यानंतर 50 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या किंवा को-मॉर्बिडीज असलेल्या 27 कोटी लोकांना लस देण्यात येईल.


विषाणूतील उत्परिवर्तन किंवा व्हेरिएंट्समध्ये रोगप्रतिकारक शक्ती असते. ते लसीकरण किंवा रोगाच्या माध्यमातून एखाद्या व्यक्तीला मिळालेल्या रोगप्रतिकारक शक्तीला चॅलेंज निर्माण करू शकतात आणि पुन्हा संसर्ग होऊ शकतो. कोविडच्या लसी प्रभावी ठरतील; पण त्यांची कार्यक्षमता कमी असू शकते. म्हणजेच लोक हा संसर्ग टाळू शकणार नाहीत, कोरोनाची लागण सौम्य स्वरूपाची असेल; मात्र लस घेणे आवश्यक आहे.


दरम्यान, तज्ज्ञांचा असा विश्वास आहे, की, टाळेबंदी हा एक कठोर उपाय आहे. महाराष्ट्र टास्क फोर्सचे सदस्य आणि एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ. शशांक जोशी यांच्या मते, डबल मास्किंग (दोन थर असलेले मास्क) आणि मायक्रो-कंटेन्ट झोनची निर्मिती प्रभावी संसर्ग रोखू शकते. जर राज्य सरकारला लसीकरणाबाबत निर्णयचा अधिकार मिळाला, तर अधिकाधिक लोकांना लसींचं संरक्षण देण्यात मदत होईल.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test 4 MahaExam