All News

नायब तहसीलदारपदी निवड होऊनही मजुरीची वेळ

नायब तहसीलदारपदी निवड होऊनही मजुरीची वेळ

मुंबई, दि. १२ मार्च : लोकसेवा आयोगाच्या परीक्षेवरून राज्यात सध्या वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाविरोधात परीक्षार्थींचा उद्रेक झाल्यानंतर आज परीक्षेच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. या गदारोळादरम्यान, लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या; पण अद्याप नियुक्ती न मिळालेल्या एका तरुणाने केलेले ट्वीट सध्या चर्चेत आले आहे. लोकसेवा आयोगाची नायब तहसीलदाराची परीक्षा पास होऊनही नियुक्ती न मिळालेल्या या तरुणावर मजुरी करण्याची वेळ आली आहे. 


प्रवीण कोटकर असे या तरुणाचे नाव असून, त्याने लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली; मात्र निवड होऊन दहा महिने झाले, तरी त्याला अद्याप नियुक्तीपत्र मिळालेले नाही. त्यामुळे या तरुणावर सध्या मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. ट्वीटरवरून व्यथा मांडताना प्रवीण कोटकर म्हणाला, की लोकसेवा आयोगाची परीक्षा दिल्यानंतर माझी नायब तहसीलदार म्हणून निवड झाली; मात्र दहा महिने झाले तरी सरकारने नियुक्ती दिलेी नाही. त्यामुळे सध्या मी शेतमजूर म्हणून काम करतो आहे. लोक आम्हाला हसतात आणि सरकरला शिव्या देतात. नियुक्ती कधी मिळणार, असा सवाल त्याने विचारला आहे. 


दरम्यान, 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा गुरुवारी रद्द केल्याची घोषणा केल्यावर पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. काही ठिकाणी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. राज्यसेवा पूर्व परीक्षा आता 21 मार्च रोजी आयोजित करण्यात येणार असून आयोगाकडून परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd test2 IBPS IBPS