All News

दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल उद्या जाहीर होणार

दहावी बारावीच्या पुरवणी परीक्षांचा निकाल उद्या जाहीर होणार

मुंबई, दि. २२ डिसेंबर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळातर्फे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी फेरपरीक्षेचा ऑनलाईन निकाल २३ डिसेंबरला दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. निकालाची प्रिंटदेखील विद्यार्थ्यांना काढता येणार आहे.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागातील दहावी, बारावीच्या पुरवणी / फेर परीक्षा नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये घेण्यात आली होती. निकाल लागल्यानंतर गुरूवार (दि.२४) ते २ जानेवारी २०२१ पर्यंत गुण पडताळणीसाठी तर, १२ जानेवारी २०२१ पर्यंत छायाप्रतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.


Advertisement

test 4 Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd IBPS