lokshahiaghadi
lokshahiaghadi
  • मुख्यपृष्ठ
  • E-Paper
  • नाशिक शहर
    • नाशिक
    • पंचवटी
    • नाशिक रोड
    • नाशिक पूर्व
    • नाशिक पश्चिम
    • नवीन नाशिक
    • सातपूर
  • नाशिक ग्रामीण
    • निफाड
    • येवला
    • चांदवड
    • नांदगाव
    • बागलाण
    • सिन्नर
    • दिंडोरी
    • कळवण
    • मालेगाव बाह्य
    • मालेगाव मध्य
    • देवळाली
    • इगतपुरी
  • महाराष्ट्र
    • उत्तर महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोकण
    • मुंबई
  • प्रशासकीय
  • COVID-19
  • साहित्य संमेलन
  • मंथन
  • राष्ट्रीय
  • विधानसभा
  • इतर
    • क्रीडा
    • मनोरंजन
    • शिक्षण
    • मनसा स्मरामी
    • शेती
    • अध्यात्म
    • जीवन शैली
    • तरूणाई
  • Home
  • News Details
  • News Details

All News

पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ संपादक जगतराव सोनवणे अनंतात विलीन

पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ संपादक जगतराव सोनवणे अनंतात विलीन

  • क्रांतिकारी!! धाडसी!!! समस्त समाजाने आदर्श घ्यावा असे क्रांतिकारी पाऊल
  •  पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ संपादक जगतराव सोनवणे यांच्या पार्थिवाला मुलासह, दोघी लेकी आणि नातीने दिला अग्निडाग
  • कोणतेही कर्मकांड नाही; दहावे, तेरावे, अस्थिविसर्जन, श्राद्ध, पिंडदान, शांतीविधीलाही फाटा!

धुळे, दि. १४ ऑगस्ट :  पुरोगामी विचारांचे ज्येष्ठ पत्रकार, दैनिक "मतदार"चे संपादक जगतराव सोनवणे उर्फ नाना यांच्या पार्थिवावर शुक्रवारी धुळ्यातील देवपूर स्मशानभूमीत कोणत्याही कर्मकांडांविना, साध्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा ऋषीसह दोन्ही मुली दीपाली व सोनाली तसेच नात सिद्धी यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला. अश्माने मडक्याला भोक पाडून चितेवरील मृतदेहाभोवती प्रदक्षिणा घालून मागे न पहाता मडके खांद्यावरून मागच्या अंगाला टाकून फोडण्याचा विधीही टाळण्यात आला. 

नानांचा देह अनंतात विलीन झाल्यानंतर दहावे, अकरावे, बारावे, तेरावे, श्राद्ध, पिंडदान, अस्थिविसर्जन, शांतोदक (निधन शांतिविधी) यासह कोणतेही विधी करण्यात येणार नाहीत. आयुष्यभर पुरोगामी विचारसरणी अंगीकारून, कर्मकांडांवर प्रहार करणाऱ्या नानांच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कारप्रसंगीचे सर्व कर्मकांड टाळण्यात आले. नानांच्या पत्नी चंद्रकलाताई यांच्यासह कुटुंबीय आणि जवळच्या सर्व नातेवाईकांनीही नानांच्या इच्छेचा आदर राखत अनावश्यक विधी टाळले. अंत्यसंस्कारप्रसंगी नानांचे हितचिंतक, समकालीन सहकारी, त्यांच्या मुशीत तयार झालेले कार्यकर्ते, पत्रकार, नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी नानांच्या कार्याच्या आठवणी जागविण्यात आल्या. भास्कर वाघ प्रकरणात त्यांनी अनेक संकटे, हल्ले परतवून, ज्या धैर्याने सारे सत्य समोर आणले, त्यातील अनेक ज्ञात-अज्ञात पैलू यावेळी उलगडले. समस्त अधिकारी वर्गातर्फे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यावेळी उपस्थित होते. नानांच्या अस्थी व राख मिसळून घराच्या प्रांगणात; तसेच शेतात वृक्षारोपण करून त्यांच्या स्मृती चिरंतन ठेवण्यात येणार आहेत.

Prev Post

Next Post

Advertisement

IBPS Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd MahaExam

Copyright © 2023 lokshahiaghadi.com . 
Developed by Highclonoid softec.  
Powered By Siddhant Media.

  • Home
  • Contact