All News

पुण्याच्या 'सीरम इन्स्टिट्यूट'मध्ये पुन्हा आग

पुण्याच्या 'सीरम इन्स्टिट्यूट'मध्ये पुन्हा आग

पुणे,  दि. २१ जानेवारी :  जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक कंपनी सीरम इन्सिट्युटच्या मांजरी येथील प्लांटमध्ये आज दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. दुपारी 1 च्या सुमारास लागलेल्या या आगीने बघता बघता 3 मजल्यांचे नुकसान केले आहे. मृतांमध्ये चार पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.


पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये ज्या ठिकाणी दुपारी आग लागली होती. त्याच ठिकाणी एका कन्पार्टमेंटमध्ये आग लागली होती. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार म्हणजेच 22 जानेवारी रोजी दुपारी आग लागलेल्या सीरमच्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. दुपारी मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने पुण्याकडे रवाना होतील.  हडपसर परिसरातील सिरमच्या आग लागलेल्या प्लांटला भेट देतील आणि पाहणी करतील.


सीरममधल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. कोव्हिडची लस बनवणाऱ्या विभागात ही आग लागली नव्हती. तिथं बीसीजी लशीचं काम सुरू होतं. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये आग लागली होती, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. सीरममधल्या सुरक्षेवर आता लगेचच भाष्य करणं योग्य होणार नाही. आधी आगीपासून सर्व वाचवणं महत्त्वाचं आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.


"घातपाताची माहिती विरोधकांकडे नेमकी कशी येते? हे गुपीत आहे. सर्जिकल स्ट्राईक किंवा इतर गोष्टींची त्यांना आधीच माहिती कशी मिळते? त्यांचं ज्ञान अगाध आहे. त्यांना काहीतरी विद्या वगैरे प्राप्त आहे. त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांनी ती जरूर द्यावी. पण त्यांना जरा संयमाची लस टोचण्याची गरज आहे," असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना लगावला आहे.


पुण्याच्या मांजरी भागातील सीरमच्या नव्या संकुतलातल्या इमारतीला ही आग लागली होती. या इमारतीच्या चौथ्या आणि पाचव्या मजल्याला आग लागली आहे. एसईझेड-3 नावाची ही इमारत आहे. ही इमारत सध्या निर्माणाधीन असल्याचं सीरमच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.


Advertisement

MahaExam IBPS Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd