All News

शेतकरी आंदोलन : पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर शरद पवार भडकले

शेतकरी आंदोलन : पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर शरद पवार भडकले

नवी दिल्ली, दि. ८ डिसेंबर : कृषी कायद्यात काही सुधारणांची गरज, सर्व पक्षांनी एकत्र यायला हवे, उद्या राष्ट्रपतींची भेट घेणार, त्यानंतर सविस्तर बोलेन, माझे पत्र बारकाईने वाचावे, असं शरद पवार म्हणाले. मात्र, जुन्या पत्रासंबंधी विचारले असता शरद पवार भडकले.


युपीए सरकार असताना त्यावेळी तत्कालीन कृषीमंत्री अध्यक्ष शरद पवार यांनी कृषी कायद्यात बदल करण्याची गरज असल्याचं पत्रात म्हटलं होतं. याचाच उल्लेख फडणवीसांनी केला. यावर पवारांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. ज्यांनी पत्राचा हवाला दिला आहे त्यांनी ते थोडं नीट वाचलं असतं तर त्यांचा वेळ वाचला असता. कायद्यातील सुधारणांसंदर्भात पत्र लिहिलं होतं यामध्ये कोणतंही दुमत नाही. पण आज जे तीन नवे कृषी विधेयक आणले आहेत त्यात याचा उल्लेख दिसत नसल्याचं पवार म्हणाले.


कृषी कायद्यासंदर्भात चर्चा झाल्याशिवाय त्याबाबत काहीही भाष्य करणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. मात्र पत्रकारांनी वारंवार पत्र आणि शेतकरी आंदोलनाबद्दल प्रश्न विचारल्याने शरद पवार संतापले आणि पत्रकार परिषद संपवून निघून गेले.

Advertisement

Highclonoid Softec Pvt Ltd IBPS test2 Highclonoid Softec Pvt Ltd