All News

साई दर्शनाच्या वेळेत कपात

साई दर्शनाच्या वेळेत कपात

शिर्डी, दि.२८ मार्च : राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारने नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून भाविकांना साईंच्या दर्शनासाठी समाधी मंदिर सकाळी सव्वासात ते रात्री पावणेआठ यावेळेत खुले राहणार आहे. साईप्रसादालय हे सकाळी दहा ते रात्री साडेसात  यावेळेत सुरू राहील.


शासनाच्या आदेशान्वये १६ नोव्हेंबर पासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे. त्यांअनुषंगाने  साईबाबा मंदिरात गर्दी होवू नये, म्हणून साई संस्थानच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. सध्या पुन्हा राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यानुसार रात्री आठ ते सकाळी सात या  यावेळेत संपूर्ण राज्यात जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे साईभक्तांना दर्शनासाठी साईबाबांचे समाधी मंदिर सकाळी सव्वासात ते रात्री  पावणेआठ यावेळेत खुले राहणार असून रात्री साडेदहा  होणारी ची शेजारती व पहाटे साडेचारची काकड आरती नेहमीप्रमाणे होईल; परंतु भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही.

Advertisement

MahaExam Highclonoid Softec Pvt Ltd Highclonoid Softec Pvt Ltd test 4