पंचवटी

  • Home
  • पंचवटी

All News

माध्यम प्रतिनिधिनसाठी ब्रह्माकुमारी मुख्यालयात महासंमेलनाचे आयोजन : नाशिकचा उत्स्फूर्त सहभाग

माध्यम प्रतिनिधिनसाठी ब्रह्माकुमारी मुख्यालयात महासंमेलनाचे आयोजन : नाशिकचा उत्स्फूर्त सहभाग माउंट आबू/आबू रोड, येथील ब्रह्माकुमारी संस्थेच्या शांतिवन कॉम्प्लेक्स मध्ये अखिल भारतीय मीडिया संमेलना चे आयोजन दि. 20 ते 24 सप्टेंबर दरम्यान करण्यात आले. यात नाशिक येथून प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडिया च्या विविध प्रसार माध्यम प्रतिनिधींनी सहभाग घेतला. '

नाशिकरांनी २७ चित्रे व शिल्पे साकारतांना अनुभवली

नाशिकरांनी २७ चित्रे व शिल्पे साकारतांना अनुभवली      नाशिक : पोर्ट्रेट आर्टिस्ट ग्रुप व नाशिक आर्ट फाउंडेशन  यांच्या संयुक्त विद्यमाने शंकराचार्य न्यास व संस्कार भारती नाशिक यांच्या विशेष सहकार्याने प्रख्यात भारतीय चित्रकार राजा रविवर्मा यांच्या स्मृतिदिनाप्रीत्यर्थ बुधवार, २ ऑक्टोबर  रोजी एक दिवसीय प्रत्यक्ष व्यक्ती चित्र/ शिल्प  स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते, सदर स्पर्धेसाठी  महाराष्ट्रातून अनेक युवा चित्रकारांनी व शिल्पकारांनी सहभाग नोंदवला होता  त्यातील निवडक २३ चित्रकार  व ५ शिल्पकार यांचे प्रत्यक्ष व्यक्तीचित्र व शिल्प स्पर्धा  कुर्तकोटी सभागृह , जुना गंगापूर नाका, नाशिक येथे सकाळी दहा ते संध्याकाळी पाच या कालावधीमध्ये   मोठया उत्साहात संपन्न झाली,   सदर स्पर्धा राष्ट्रीय पातळी ची असून त्याच्या अंतिम फेरी निवडी साठीची ही दुसरी फेरी  स्पर्धकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आली होती, 

कांद्याची निर्यात बंदी करून “शेतकऱ्यांचे मरण हेच युती सरकारचे धोरण”असल्याचे सिद्ध सरकारने सिद्ध केले - राष्ट्रवादी आरोप

गेली ५ वर्षे सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे राबविणाऱ्या भाजप-शिवसेना सरकारने कांद्याची निर्यात बंदी करून “शेतकऱ्यांचे मरण हेच युती सरकारचे धोरण” असल्याचे सिद्ध केल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पगार यांनी केला आहे.

आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ खा. डॉ अमोल कोल्हे दोन दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर

आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारार्थ खा. डॉ अमोल कोल्हे दोन दिवस नाशिक जिल्हा दौऱ्यावर   नाशिक,दि.१० ऑक्टोबर:-  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे खासदार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे शुक्रवार दि.११ व शनिवार दि.१२ ऑक्टोबर रोजी नाशिक जिल्हा दौऱ्यावर असून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्र पक्ष आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ विविध ठिकाणी सभा घेणार आहे. तसेच रॅली व रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटी गाठी घेणार आहे. शुक्रवार दि ११ ऑक्टोबर रोजी डॉ. अमोल कोल्हे यांची आमदार दीपिका चव्हाण यांच्या प्रचारार्थ सकाळी ११ वाजता नामपूर ता. बागलाण येथे सभा होणार आहे.

पाच हजार नाशिककरांनी चाखली रानभाज्यांची चव

आदिवासी भागात उपलब्ध होणाऱ्या रसायनविरहीत विषमुक्त भाज्यांची ओळख शहरातील नागरिकांना व्हावी म्हणून सोशल नेटवर्कींग फोरमच्या वतीने नाशिक येथील कुसूमाग्रज प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आलेल्या रानभाजी महोत्सवाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

पंचवटीत अतिक्रमणे हटविली; मोहीम सुरू राहणार

नाशिक महानगर पालिकेतर्फे पंचवटीत अतिक्रमण निर्मुलन मोहीम राबविण्यात आली. शहरात सर्व ठिकाणी ही मोहीम सुरु राहणार असल्याचे मनपाने कळविले आहे.

प्रकाश जाधव यांची राजेश पायलट किसान संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड.

नाशिक : नाशिक जिल्ह्या भटके विमुक्त संघटनेचे माजी अध्यक्ष व शहर कॉंग्रेसचे माजी सरचिटणीस प्रकाश महादू जाधव यांची नुकतीच राजेश पायलट किसान संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यांची निवड राष्ट्रीय अध्यक्ष चौधरी रामकेश गुज्जर यांनी प्रदेश अध्यक्ष राजकुमार यांच्या सुचनेनुसार करण्यात आली.जाधव यांनी आगामी काळात शेतकरी कामगार वर्गाच्या न्याय हक्कासाठी लढून न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे संकल्प केला.

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने गृहदेवता पूजन सोहळा

जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने आणि प्रमुख उपस्थितीत शनिवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजता नाशिक शहरातील जय गुरुदत्त लॉन्स, औरंगाबाद रोड येथे सत्संग आणि गृहदेवता पूजन, पालखी मिरवणूक आदी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

मतदान करा आणि दाढी कटिंग मध्ये ५० टक्के सूट मिळवा

राज्यात सगळीकडे निवडणुकांची धामधूम सुरू असून येत्या २१ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करून येणाऱ्या नागरिकास दाढी कटिंग मध्ये ५०% सूट दिली जाणार आहे.

लोकमान्यच्या रांगोळी स्पर्धेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित रांगोळी स्पर्धेतून स्पर्धकांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत प्रदूषणविरहीत दिवाळी साजरी करण्याचा मानस रांगोळीतून व्यक्त केला.

निमाकडून 'राष्ट्रीय आयुर्वेद दिना’ साजरा

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन अर्थात निमाच्या वतीने शुक्रवारी 'राष्ट्रीय आयुर्वेद दिन'साजरा केला गेला. आरोग्याची देवता श्री धन्वंतरी यांच्या जयंतीच्या निमित्ताने दरवर्षी आयुर्वेद दिन साजरा केला जातो. यंदा'दीर्घायुष्यासाठी आयुर्वेद ही संकल्पना राबवली जात आहे.

अल्पसंख्यांक विभागाच्या अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

अल्पसंख्याक विभागाच्या अनुदान योजनांसाठी मुदतवाढ देण्यात आली असून प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी यांनी केले आहे.

खाजगी गुंतवणुकीतून देणार भावली धरण परिसरातील पर्यटनाला चालना : जलसंपदा मंत्री जयंत पाटील

खाजगी गुंतवणुकीतून देणार भावली धरण परिसरातील पर्यटनाला चालना : जलसंपदा मंत्री जयंत पाटील नाशिक, दि. 25 जुलै 2020 (जिमाका वृत्तसेवा): संपूर्ण जगावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात संसर्ग बाधितांची संख्या देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत खाजगी गुंतवणुकीतून भावली धरण परिसरात पर्यटनाला चालना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले आहे.

More News