पश्चिम महाराष्ट्र

  • Home
  • पश्चिम महाराष्ट्रर

All News

विवेक विजय मोरे यांना राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांचे हस्ते निशान प्रदान

पुणेः भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांचे हस्ते लेफ्टनंट विवेक विजय मोरे यांना दि 28 सप्टेंबर रोजी गोपाळपुर (ओरीसा)येथे निशान प्रदान करण्यात आले हा क्षण ऐतिहासिक असुन माळशिरस तालुका तसेच महाराष्ट्र राज्य मधील सर्व लोकांना अभिमान वाटावा अशी अविस्मरणीय क्षण आहे.

आईमुळे समाजकार्याशी नाळ जोडली गेली : प्रतापराव पवार अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थी सहायक समितीतर्फे पुण्यात कृतज्ञता समारंभ.

पुणे : ‘आईने चांगले संस्कार केले आणि तिच्यामुळेच समाजकार्याशी माझी नाळ जोडली गेली,’ अशा भावना विद्यार्थी सहायक समितीचे आणि ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी व्यक्त केल्या. पवार यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त नऊ ऑक्टोबर रोजी पुण्यात विद्यार्थी सहायक समिती आणि माजी विद्यार्थी मंडळाच्या वतीने ‘अमृतअनुभव’ या कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी प्रसिद्ध निवेदक सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीतून पवार यांच्या आयुष्याचे विविध पैलू उलगडले.

१३ वर्ष मंत्रीपद दिल्यानंतर कुणाला काही करता येणार नसेल तर एकतर बांगड्या तरी भरल्या पाहिजेत-शरद पवार

१३ वर्ष मंत्रीपद दिल्यानंतर कुणाला काही करता येणार नसेल तर एकतर बांगड्या तरी भरल्या पाहिजेत अशा शब्दात शरद पवार यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा श्रीगोंदा येथील जाहीर सभेत खरपूस समाचार घेतला.

बारामती तालुक्यात अनोखी शक्कल; चिखलामुळे मतदारांसाठी उभारला ट्रॉलींचा पूल

पावसानंतर मतदान केंद्रावर झालेल्या चिखल आणि दलदलीमुळे प्रशासनाने वेगळीच शक्कल लढविली. मतदारांची गैरसोय होऊ नये म्हणून मतदान केंद्रापर्यंत चक्क ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा पूल उभारला गेला.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजे पराभूत

खासदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून भाजपात प्रवेश केलेल्या छत्रपती उदयनराजे भोसले सातारा लोकसभा पोटनिवडणूकीत पिछाडीवर आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील हे आघाडीवर आहे.

शरद पवारांच्या झंझावातानं वातावरण फिरलं; राष्ट्रवादीला तारलं

केंद्रातील भाजपाच्या लाटेमुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या अनेकांनी पक्ष सोडला. सर्वजण राष्ट्रवादी आणि शरद पवार संपले असेच म्हणत होते, मात्र ऐंशीच्या उंबरठ्यावर असलेल्या शरद पवार यांनी करून दाखविले.

राष्ट्रवादीचा निर्णय ३० तारखेला...

जर तर च्या गोष्टींवर बोलण्यात काही अर्थ नाही, ३० ऑक्टोबरला राष्ट्रवादी ची बैठक आहे, त्यात आमचा निर्णय होईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रस्ताव आला तर विचार करणार का या प्रश्नाला ते उत्तर देत होते...! निकालानंतर अजित पवार पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले.

राष्ट्रवादीचा प्रचार केल्याने तरुणावर हल्ला

हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा फेसबुकवरुन प्रचार केल्याच्या रागातून युवकावर कोढव्यात खुनी हल्ला झाला.

कार्तिकी एकादशीनिमित्त महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा

राज्यातील शेतकरी आणि सामान्य जनता सुखी होऊ दे,असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी आज सकाळी घातले.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो कामाला गती येण्यासाठी त्रिस्तरीय समिती गठीत

पंचवटी, पाषाण ते पौड रोड भुयारी मार्गाच्या सर्वेक्षणासाठी लागणारी संरक्षण विभागाची परवानगी नुकतीच मिळाली

कोरोना’ संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत- अजित पवार

'कोरोना' विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय 'कोरोना' संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही

...तर १० ऑगस्ट नंतर रस्त्यावर उतरू - प्रकाश आंबेडकर

राज्यातील कोरोना रुग्णांना चांगले औषध द्या, उरलेल्या ९५ टक्के लोकांना का कैद करून ठेवत आहे.

बारामती शहरासह तालुक्यात ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना कडक राबवा

बारामती शहरासह तालुक्यात ‘कोरोना’चा प्रसार रोखण्यासाठी ‘कोरोना’ प्रतिबंधक उपाययोजना कडक राबविण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

ग्रामीण भागातील मृत्यूदर वाढू देऊ नका

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व्यापक प्रमाणात प्रयत्न करीत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात चौथऱ्यावरुन हटवला; सोशल मीडियावर संताप

बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आला आहे.

महापुराची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यांमध्ये समन्वय

गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या जोरदार पावसामुळे कोल्हापूर सांगली भागात पूर परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे.

मराठा समाज आरक्षण उपसमितीवरून अशोक चव्हाण यांना हटवा : आमदार मेटे

मराठा आरक्षणाच्या उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाण यांना हटवण्याची मागणी शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख आणि आमदार विनायक मेटे यांनी केली आहे.

सातारा, कोल्हापूरमधील कोरोना परिस्थितीचा शरद पवारांनी घेतला आढावा

कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदन (टाऊन हॉल) येथे सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील कोविड-१९ प्रादुर्भावाच्या सद्यपरिस्थितीचा आढावा व संसर्ग रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजना या संबंधिची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज घेतली.

प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढे येण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

ॲपवर प्लाझ्मा दान करण्यासाठी ३३ जणांनी इच्छा प्रदर्शित करून नोंदणी केली आहे तर ६१ जणांनी प्लाझ्माची मागणी केली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पुणे विधानभवन प्रांगणात मुख्य ध्वजारोहण

राज्यपालांनी लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे, स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन विचारपूस केली तसेच स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

नागपूरात कोविड रुग्णांसाठी मानकापूर येथे जम्बो हॉस्पिटल

'जम्बो हॉस्पिटल’च्या निर्मितीमुळे कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना सोयीचे होईल, असा विश्वास डॉ.राऊत यांनी यावेळी व्यक्त केला.

वन उद्यानाचे वनमंत्र्यांनी केले ऑनलाईन उद्घाटन

पर्यावरणाच्या संरक्षणासाठी वनविभागाचे कसोशीने प्रयत्न सुरु आहे. मात्र यात नागरिकांचेही सहकार्य मिळणे आवश्यक आहे.

पुणे – बंगळुरु महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे आदेश

ई-पास घेतलेल्या वाहनांकडून कुठल्याही प्रकारचे टोल वसुल न करण्याचे आदेशही शासनाने निर्गमित केले आहेत.

‘कोरोना’च्या रुग्णांना खाटा अपुऱ्या पडणार नाहीत याची दक्षता घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केला पाहिजे.

‘कोरोना’मुळे राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्नशील -उपमुख्यमंत्री अजित पवार

लोकाभिमुख, पारदर्शक, दर्जेदार व टिकाऊ स्वरुपाची कामे पूर्ण व्हावीत, विकासाचा गाडा यापुढेही असाच सुरु राहील.

श्री गणपती बाप्पांच्या कृपेने महाराष्ट्र लवकरच कोरोनामुक्त होईल

कोरोना संकटामुळे गणेशभक्तांनी घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सव यंदा गर्दी टाळून, सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून साधेपणानं साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

चंद्रकांत पाटलांना न्यायालयाचा दणका, याप्रकरणी दिले चौकशीचे आदेश

पाटील यांनी २०१६ ते २०१९दरम्यान उत्पन्नाच्या स्रोतबाबत खोटी माहिती दिली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

पुणे शिवाजीनगर येथील कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

सिरम इन्स्टिट्यूटच्या कोविड-१९ वरील लसीची पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये होणार चाचणी

जगभरात कोवीड १९ वर लस शोधण्याचे काम दिवसरात्र सुरू आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा कोरोनावर लसची निर्मिती सुरू आहे.

‘चेस दी व्हायरस’ संकल्पना राज्यभर राबविणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुण्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्येही कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो रुग्णालयाची अत्यंत कमी कालावधीत उभारणी केली

‘कोरोना’ विरुद्धची लढाई एकजुटीने लढल्यास नक्की जिंकू – उपमुख्यमंत्री अजित पवार

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने ॲटो क्लस्टर, चिंचवड येथील कोविड-१९ रुग्णालयाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले‌.

ग्रामीण भागातील कोरोना उपाययोजनांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा लोकप्रतिनिधींशी संवाद

कुठेही गर्दी होणार नाही आणि व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील याबाबत प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले.

कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी मास्कचा वापर व सुरक्षित अंतर ठेवण्याची दक्षता घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ‘कोरोना’बाबतच्या उपाययोजनाबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

बाळासाहेबांवरील गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

बाळासाहेबांवरील गुन्हे मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पंढरपूर, दि. १ - वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह बाराशे कार्यकर्त्यांवर पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईचा वंचित बहुजन आघाडी तसेच वारकरी सांप्रदाय व अन्य संघटनांनी तीव्र विरोध करीत नाराजी व्यक्त केली. हे गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी तर्फे देण्यात आला.

पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन

रायकर हे सध्या टीव्ही 9 या वृत्तवाहिनीसाठी काम करीत होते. पांडुरंग रायकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता संसर्ग ही चिंतेची बाब

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील कोरोनाबाबतचा आढावा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला.

खासदार शरद पवार यांनी घेतला पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन खासदार शरद पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांशी राज्यमंत्री तटकरे यांनी साधला ऑनलाईन संवाद

पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिजनेस मॅनेजमेंट, पिरंगुट, पुणे येथील एम.बी.ए. च्या विद्यार्थ्यांशी राज्यमंत्री कुमारी तटकरे यांनी ऑनलाईन संवाद साधला.

राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा ११७ वा दीक्षांत समारोह

महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तसेच लोकमान्य टिळक यांचे आदर्श डोळ्यांपुढे ठेवून कार्य केल्यास तुम्ही देखील आदर्श नागरिक व्हाल असे राज्यपालांनी यावेळी युवकांना सांगितले.

जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन सुरळीत ठेवावे ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे आणि पिंपरी चिंचवडसह ग्रामीण भागातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या जमीन संपादनासाठी ५० कोटींचा निधी

सोलापूर शहरात होटगी येथे सद्यस्थितीत विमानतळ आहे, मात्र या विमानतळाचा वापर सध्या नॉन शेड्युल फ्लाईट (अनुसूची नसलेली विमान उड्डाणे) करिता करण्यात येत आहे.

अभियांत्रिकी महाविद्यालय पुण्याला सर्वोत्कृष्ट ‘विश्वकर्मा’ पुरस्कार

एआयसीटीई अंतर्गत असणाऱ्या देशातील विविध संस्थांना 14 श्रेणींमध्ये 34 संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.

पुणे मेट्रोसाठी राज्य शासनाचे सर्वतोपरी सहकार्य

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे व पिंपरी-चिंचवड मेट्रोचा आढावा घेतला. यावेळी महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच पुणे जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्याचा निर्णय घ्या

शहरी भागासह ग्रामीण भागातील ‘कोरोना’चा रुग्णदर व मृत्यूदर कमी होणे गरजेचे असून यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात. ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन पुरेसा निधी उपलब्ध करुन देईल.

शहीद नायक सचिन जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

सातारा जिल्ह्यातील 111 इंजिनियर रेजिमेंटचे नायक सचिन संभाजी जाधव यांना दि. 16 सप्टेंबर 2020 रोजी सैन्यामध्ये सेवा बजावताना वीर मरण प्राप्त झाले होते.

महाराष्‍ट्र गुप्‍तवार्ता प्रबोधिनीस सर्वतोपरी मदत – गृहमंत्री अनिल देशमुख

प्रत्‍येक राज्‍यात खालपासून वरपर्यंत गुप्‍तवार्ता यंत्रणा आवश्‍यक आहे. अस्थिरता निर्माण करु पाहणा-या शक्‍ती बॉम्‍बस्‍फोटासाठी ड्रोनसारख्‍या वेगवेगळया तंत्रज्ञानाचा वापर करत असतात

कोरोनावर प्रभावीपणे नियंत्रण मिळविण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिम महत्त्वपूर्ण

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेमुळे कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे. पूर्वनिदान झाले तर मृत्यूचे प्रमाणही कमी होणार आहे.

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेतून ‘सुदृढ आणि निरोगी महाराष्‍ट्र’ निर्माण झाला पाहिजे – मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोनाचा मुकाबला करण्‍यासाठी आपल्‍याला एका मार्गाने जावे लागणार आहे. कोणतीही मोहीम यशस्‍वी होण्‍यासाठी त्‍यामध्‍ये जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणात असायला हवा.

आयुर्वेद व आधुनिक वैद्यकशास्त्र शाखांनी एकत्रित संशोधन कार्य करावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

आयुर्वेदिक औषधांच्या प्रसारासाठी केवळ मार्केटिंग न करता संशोधनावर अधिक भर दिला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

‘पुणे स्मार्ट सिटी’ची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून मिळणाऱ्या निधीचे योग्य प्रकारे नियोजन करावे.

पुण्यातील पाच रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’ सुरु करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

‘कोविड व्यवस्थापना’बाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील विधानभवन सभागृहात संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

दोन महान नेत्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील व राष्ट्रउभारणीतील कार्याचे स्मरण करून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.

प्रादेशिक पाणीपुरवठा योजना राबविण्याचे कार्यादेश तातडीने द्या

मंत्रालयात पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील गावांमध्ये कार्यवाही सुरु असलेल्या सहा योजनांबाबतची आढावा बैठक आयोजित करण्यात आली.

ग्राम युवा विकास समितीच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा

ग्राम युवा विकास समितीच्या माध्यमातून ग्राम विकास साधण्यास मदत होईल. तसेच युवकांच्या आशा,आकांक्षा, समस्या जाणून घेणे शक्य होईल. समन्वयक यशवंत मानखेडकर यांनी युवा केंद्राचा वार्षिक आराखड्याअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

सकाळ समुहाचे संचालक भाऊसाहेब पाटील यांचे निधन

भाऊसाहेब पाटील यांचे मुळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील बामणी (ता. कागल). अंत्यसंस्कार बामणी येथे पहाटे होणार आहेत. पाटील यांनी सकाळमध्ये 34 वर्षे सेवा केली.

‘पुणे स्मार्ट सिटी’ची कामे जलद गतीने पूर्ण करा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

पुणे स्मार्ट सिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या सर्व प्रकल्पांची कामे दर्जेदार झाली पाहिजेत. सर्व प्रकल्पांची कामे मुदतीत पूर्ण होण्यासाठी नियोजन करा.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ॲग्रो ॲम्बुलन्स लोकार्पण

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून फिरती माती, पाणी व पानदेठ परिक्षण प्रयोगशाळा असलेल्या ॲग्रो ॲम्बुलन्सचे लोकार्पण करण्यात आले.

माजी आमदार सुरेश गोरे यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली

शिवसेनेत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसशी ते प्रदीर्घ काळ निगडीत होते. राष्ट्रवादीशी त्यांचं वेगळे नाते होते. पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व प्रदीर्घ काळ सदस्य म्हणून काम केलेल्या सुरेश गोरे यांच्याबद्दलच्या अनेक आठवणी आहेत.

पुणे जिल्ह्यातील विश्वनाथ मुजुमले यांना मिळकत पत्रिका ऑनलाईन प्रदान

जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या हस्ते पुणे जिल्ह्यातील लाभार्थी विश्वनाथ मुजुमले यांना प्रत्यक्ष मिळकत पत्रिका वितरित करण्यात आली.

श्रीकांत दातार यांची नियुक्ती महाराष्ट्र व देशाचा गौरव वाढवणारी : उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई विद्यापीठाचे पदवीधर व प्रयोगशील प्राध्यापक असलेल्या श्रीकांत दातार यांनी व्यवस्थापकीय शिक्षणाच्या क्षेत्रात विज्ञान, तंत्रज्ञानाच्या बरोबरीने मानवी मूल्ये रुजवण्यावर भर दिला.

महाराष्ट्र विधिमंडळाच्या कार्यवृत्तांच्या डिजिटलायझेशनबाबत पुण्यात आढावा बैठक

बैठकीत विधानमंडळ कार्यवृत्तांसाठी तयार केलेल्या संगणकीय प्रणालीचे सादरीकरण करण्यात आले.

जाहिरातींचे महत्व वाढेलच...

जाहिरात म्हणजे प्रत्येक माध्यमाचा श्वास आहे...आणि आज आणि इथून पुढे जाहिरातींचे महत्त्व वाढेलच पण कधीही कमी होणार नाही..कोणताही व्यवसाय असू दे..जाहिरात हवीच....

पुण्यात पावसाचा धुमाकूळ

राज्यभरात परतीचा पाऊस हजेरी लावत आहे. येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

पुण्यासह राज्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

पंढरपूरच्या कुंभारघाटावरील भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील सहा जणांच्या मृत्यूची चौकशी करुन दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

घटस्थापनेने श्री तुळजाभवानी देवी शारदीय नवरात्र महोत्सवास प्रारंभ

कोरोनामुळं भक्तांविना नवरात्रउत्सव साजरा होत आहे. मात्र या स्थितीतही मंदिर संस्थानांकडून भक्तांसाठी लाईव्ह दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत आहे. मात्र केंद्रीय संस्थांकडून नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

केंद्राकडे बोट न दाखवता राज्याने मदत करावी : फडणवीस

याबाबत कोणीच सोयीस्कर राजकीय भूमिका घेऊ नये. सगळ्याच नेत्यांना मदत कशी मिळते हे माहिती आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना टोलवाटोलवी नको.

अतिवृष्टीग्रस्तांना लवकरात लवकर मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अक्कलकोट तालुक्यातील सांगवी खुर्द येथील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागास भेट देऊन ग्रामस्थांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अतिवृष्टीमुळे मृत पावलेल्यांच्या वारसांना धनादेशाचे वाटप

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.

कोल्हापूर जिल्हयातील इचलकरंजीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यानं स्वतःला घेतलं पेटवून

शिवीगाळ करुन मारहाण करणार्‍या संबंधीत घंटागाडीच्या चालकावर कारवाई करावी. या मागणीसाठी त्याने सोमवार २६ ऑक्टोबर रोजी नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

ऊसतोड मजुरांना यंदा १४ टक्के दरवाढ

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ऊसतोड मजुरांनी अधिक न ताणता 21 रुपयांची दरवाढ मिळाली तर ऊसतोडणीसाठी निघावे, अशी भूमिका घेतली होती.

उदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द

मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी हे आयोजन करण्यात आले होते. मात्र आता ही परिषद रद्द करण्यात आली आहे.

ठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या, पण.. - संजय राऊत

राज्यात तीन पक्षाचं सरकार आलं. तेव्हा हे सरकार जास्त दिवस चालणार नाही, असं सांगितलं गेलं होतं. ठाकरे सरकार लवकर कोसळेल अशा पैजा लावल्या होत्या.

दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या जन्मदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

डॉ.नरेंद्र दाभोळकर साहेबांच्या कार्याला, विचारांना, स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो, असे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी म्हटले आहे.

एफआरपी थकवला तर साखर कारखाने बंद पाडणार, राजू शेट्टी यांचा इशारा

केंद्र सरकारने इंधन आणि साखरेच्या दरांत वाढ केली आहे. त्यामुळे आमची मागणी चुकीची नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितलं आहे.

पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघ निवडणूक आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा

आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या सर्व सूचना, कोविड-19 च्या अनुषंगाने घ्यावयाची खबरदारी आदींबाबत आयुक्त राव यांनी सूचना केल्या.

ईडी कुणावरही पुराव्याशिवाय छापा टाकत नाही : फडणवीस

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुंबईत इतर 10 ठिकाणी ईडीची छापेमारी केली आहे. मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी ही कारवाई सुरु असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी साकडे

अवघ्या जगासमोर कोरोनाचे आव्हान आहे. आपण या आव्हानाला सक्षमपणे तोंड देत आहोत. पण गेला काही काळ कोरोना आटोक्यात आला, असे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण परत वाढत आहेत.

पंढरपूरचे आमदार भारत भालकेंचे निधन, पुण्यात घेतला अखेरचा श्वास

कायम लोकांमध्ये राहणारा अतिशय रांगडा नेता अशी भारत भालके यांची ओळख होती. डोक्यावर परिट घडीची पांढरी टोपी, पांढरा तीन गुंड्यांचा पैलवान शर्ट आणि विजार असा साधा पोशाख तसंच कायम दाढीत असणारे नाना यांची ग्रामीण बाजाची भाषा जनतेत खूप लोकप्रिय होती. बेधडक बोलणारा आमदार असा त्यांची ओळख असल्याने अधिकारी वर्गातही त्यांच्याविषयी भीतीयुक्त आदर होता.

सोलापूरचे शिक्षक रणजितसिंह डिसलेंना ७ कोटींचा ग्लोबल टीचर पुरस्कार

रणजितसिंह डिसले यांनी आपल्याला मिळालेल्या बक्षिसाच्या एकूण रकमेपैकी 50% रक्कम अंतिम फेरीतील 9 शिक्षकांना देण्याचे ठरवले आहे. यामुळे 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाईल.

ग्लोबल टीचर पुरस्कारामुळे भारताची मान उंचावली – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

डिसले यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करत सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना उत्कृष्ट पद्धतीने शिक्षण मिळावे हा ध्यास घेऊन ज्ञानदानाचे काम केल्यामुळे त्यांची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली.

इंग्रजी शाळांबरोबर स्पर्धा करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमधून जास्तीत जास्त तंत्रस्नेही व सृजनशील शिक्षक निर्माण करण्यासाठी मी प्रयत्न करणार अशी भावना सत्कार समारंभाला उत्तर देताना रणजितसिंह डिसले यांनी व्यक्त केली.

सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

३१ डिसेंबरपर्यंत फलक हटवला नाहीतर, आम्ही पुन्हा शिर्डीत येऊन आंदोलन करू. असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनी शिर्डी संस्थानास दिला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची (मिसिंग लिंक) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली पाहणी

राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी खोपोली ते कुसगाव नवीन मार्गिकेच्या बांधकामाची माहिती दिली.

संतांनी भारत देश जोडण्याचे कार्य केले – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

सुषमा नहार यांनी संपादित केलेल्या ‘गुरु ग्रंथसाहिब मधील संत नामदेव’ या पुस्तकात संत नामदेवांची एकसष्ट पदे मराठी अन्वयार्थासह समाविष्ट केली आहेत.

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे याचं निधन

गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, महिन्याभराच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

पैसे घेणारी महिला वाहतूक पोलिस निलंबित

स्वाती सोन्नर असे निलंबन झालेल्या वाहतूक पोलिस महिलेचे नाव आहे. त्या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत.

एल्गार परिषद वादाच्या भोवर्‍यात

कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी एक जानेवारीला देशभरातील अनुयायी येत असतात. याच निमित्ताने यंदाही पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानागी नाकारली

स्वारगेट पोलीस ठाण्यात त्यांनी अर्ज दिला होता. मात्र, पोलिसांनी सध्याच्या परिस्थितीत एल्गार परिषदेला परवानगी देता येणार नाही, असे सांगत हा अर्ज फेटाळून लावला आहे.

नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक एक तारखेला बंद

कोरेगाव भीमा येथे एक जानेवारीला लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी येत असतात; पण कोरोनामुळे लोकांनी यंदा घरातूनच अभिवादन करावे.

कृषी कायद्यांबाबत विरोधकांकडून अपप्रचार : देवेंद्र फडणवीस

कृषी विधेयकाविरोधात आंदोलने केली जात आहेत. विरोधकांना या मुद्द्याचे फक्त राजकारण करायचे आणि त्यांना फक्त जाणूनबुजून विरोध करायचा आहे.

शिर्डी विमानतळासाठी तीनशे कोटी

शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळारून कार्गो सेवा सुरू करण्यासाठी बी. सी. ए. सी. यांच्याकडे प्रस्ताव दाखल केले आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात अपघात, चार ठार

कल्याण-निर्मल-विशाखापट्टणम रस्त्यावर तालुक्यातील देवराईजवळ रात्री उशिरा हा अपघात झाला.

साईंच्या आरतीसाठी देणगी मागितल्याचा आरोप

साई संस्थानकडून रोज 12 हजार भाविकांना दर्शनाची परवानगी दिली जाणार आहे. त्यात आठ हजार भक्तांना ऑनलाईन फ्री पास तर चार हजार भक्तांना ऑनलाईन पेड पास दिले जाणार आहेत.

चोरांना पाहून पोलिसच पळाले!

पुणे शहराच्या औंधमधील सिद्धार्थनगर भागातील शैलेश टॉवर सोसायटीमध्ये 28 डिसेंबर रोजी ही घटना घडली. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास चार चोरटे धारदार शस्त्र घेऊन सोसायटीत घुसले.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी गोंधळ

राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता.

चोरांना पाहून पळणारे पोलिस निलंबित

औंध येथील शैलेश टॉवरमध्ये सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला होता. हवालदार प्रवीण गोरे आणि पोलिस नाईक अनिल अवघडे हे औंध येथे मार्शल म्हणून कर्तव्यास होते.

कोरेगाव भीमात जाऊन अभिवादन करणारच

दिल्लीतील शेतकरी आंदोलनावरुन चंद्रशेखर आझाद यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. महिनाभर शेतकरी आंदोलन करत आहेत; पण सरकार त्यांची बाजू ऐकून घेत नाही.

अजित पवार-देवेंद्र फडणवीस उद्या पुन्हा एकाच कार्यक्रमात

नुकत्याच झालेल्या विधिमंडळ अधिवशेनात पवार आणि फडणवीस यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली होती. फडणवीस आणि पवार यांनी एकत्र येत पहाटे घेतलेला शपथविधी गाजलेला होता.

राज्यात आधुनिक पद्धतीची कारागृहे बांधणार

राज्यात क्षमतेपेक्षा दुप्पट कैद्यांची संख्या झाली असून, दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. कारागृहात कोरोनाचा संसर्ग अधिक पसरू नये, यासाठी कोरोनाकाळात 11 हजार कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य प्रेरणा देणारे : मंत्री भुजबळ

फुले दांपत्यानी समाज परिवर्तनाचे मोठे काम केले आहे यामुळेच आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांबरोबर काम करीत आहे.

संभाजीनगर नामांतराविषयी शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी : दरेकर

देवेंद्र फडणवीस यांनी संभाजीनगरचे नामांतर करावे, पण कदाचित राऊत यांना ही प्रक्रिया माहित नसावी किंवा जाणूनबुजून ते दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे.

ठाकरेंकडून हकालपट्टी, पवारांकडून पक्षप्रवेश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती सोलापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी दिली.

मोबाइल मॅपने केला घात, तिघे बुडाले

सतीश सुरेश घुले (वय 34), गुरुसत्य राजेश्वर राक्षेकर (वय 42), समीर अतुलकर (वय 44 सर्व रा. पिंपरी चिंचवड, पुणे) हे एम .एच.14 के. वाय. 4079 या गाडीने कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी रात्री निघाले होते.

हाय प्रोफाईल मसाजच्या नावाखाली फसवणूक

फसवणुकीच्या अशा प्रकरणांमध्ये आंतरराज्य रॅकेट सक्रिय असून त्यांच्यापर्यंत पोहचण्यात पोलिसांना मोठ्या अडचणी येतात.

टोल नाक्यांना मुद्रांक शुल्क वसुलीचे आदेश

कोरोना व टाळेबंदीमुळे राज्य शासनाच्या मुद्रांक शुल्क विभागाच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.

सरपंचपदाचे आरक्षण पुढच्या महिन्यात

पाटील यांच्या खानापूर गावात भाजपची धूळधाण झाली आहे. मतदारांनी भाजप उमेदवारांना नाकारले आहे. पर्यायाने चंद्रकांत पाटलांना हा मोठा धक्का मानण्यात येतो.

पी. एन. गाडगीळच्या संचालकांना दीड कोटींना गंडा

चंदीगडमध्ये व्यवसाय सुरू करून देण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक पु.ना.गाडगीळ यांना एक कोटी 60 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

पुण्याच्या 'सीरम इन्स्टिट्यूट'मध्ये पुन्हा आग

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवार म्हणजेच 22 जानेवारी रोजी दुपारी आग लागलेल्या सीरमच्या युनिटच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करणार आहेत.

आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना 'इतक्या' लाखांची मदत जाहीर

आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ज्या ठिकाणी आग लागली तिथं करोना व्हॅक्सीन बनत नाही तर बीसीजीसाठीची लस बनते. आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आग लागलेल्या सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी

पुण्यातील सिरम इन्स्ट्यिट्यूटला लागेल्या आगीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संध्याकाळी दुर्घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

डेटिंग अ‍ॅपवरून लुबाडले १६ युवकांना

या तरुणीने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल 16 तरुणांना डेटिंग अ‍ॅपद्वारे आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडील दागिने लंपास केले.

राज्यपालांनी अंत पाहू नये

आणखी एक उपमुख्यमंत्रिपद असे काही ठरलेले नाही. मी कालच हे सांगितले, आता काय स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का?’ राज्यात दोन उपमुख्यमंत्रिपद असण्याचा प्रश्नच नाही.

कोरेगाव भीमाप्रकरणातील राव यांना जामीन

वरवरा राव यांची प्रकृती खालावल्याने त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

माजी खासदाराच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स येथे काल (रविवार 21 फेब्रुवारी) पार पडला होता.

माघ एकादशीची पूजा भाविकाविना

रुक्मिणी मातेची पूजा मंदीर समितीचे सदस्य ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या उपस्थित झाली. या वेळी मंदिर समितीच्या सदस्य शकुंतला नडगिरे, मंदिर समितीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

वाईत परदेशी तरुणांचा विवस्त्र धिंगाणा

सोमवारी रात्री सातारा पोलिसांनी या बंगल्यावर छापा टाकला. यानंतर बंगल्यात गांजा पिकवण्याचा धक्कादायक बाब समोर आली आहे.

पूजा चव्हाणचा खूनच, आजी शांताबाईचा आरोप; पोलिसांपुढे दिला जबाब

मंत्र्यांशी सातत्याने संपर्कात असलेला अरुण राठोड स्वतःच्या मूळगावी असून, दिवसभर बाहेर असतो आणि संध्याकाळी घरी येतो, असा दावा शांताबाई यांनी केला.

अगस्ती आश्रमातील महाशिवरात्रीची यात्रा रद्द

अकोले येथे दरवर्षी शिवरात्रीची यात्रा दोन दिवसांची असते आणि किमान चार ते पाच लाख भाविक यात्रेला गर्दी करीत असतात. तथापि सध्या कोरोनाने डोके वर काढले असल्याने या यात्रेवर नैसर्गिक संकट आले आहे.

विष पिणार नाही, पाजणारः उदयनराजे

मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांच्या मानसिक परिस्थितीविषयी त्यांनी भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही राजकारण केले नाही, म्हणून स्वराज्याची स्थापना झाली.

वीजबिल वसुलीविरोधात राज्यभर आंदोलन

राज्यातील शेतकर्‍यांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ करावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली. वीजबिल माफीशिवाय आम्ही माघार घेणार नाही.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर तणाव, एसटीवर दगडफेक; वाहतूक बंद

बेळगावमध्ये शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर सांगलीमध्ये एसटी आगाराकडून कर्नाटक राज्यातील बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर

23 मार्च पासून अर्ज दाखल करण्यात येणार असून 30 मार्च रोजी अंतिम मुदत आहे. अर्जाची छाननी 31 मार्च रोजी असून, तीन एप्रिलपर्यंत अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे.

आणखी दोन मंत्री राजीनामा देणार?

कोल्हापुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, की वाझे प्रकरणाची मुळे लांबपर्यंत गेली असून सरकार तुमचे असतानाही खासदार मोहन डेलकर आत्महत्या प्रकरण दाबले जाते असा आरोप नाना पटोले कसे काय करत आहेत.

बैलगाडीतून वरातीचा त्याने सुरू केला व्यवसाय

अलीकडच्या काही काळात लग्नाळू मुलामुलींचे विवाह अगदी साध्या पद्धतीने साजरे होत आहेत. लग्नाची वरात बैलगाडीवरून काढण्याची क्रेझ वाढली आहे.

राज्य सरकार बरखास्त करावे

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे उद्या सोमवारी ही मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारने केला राज्याचा तमाशा

सरकारवर निशाणा साधताना ते म्हणाले, की मनसुख हिरेन यांचा ज्या ठिकाणी मृतदेह सापडला, त्याच ठिकाणी दुसरा मृतदेह सापडला.

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे विभागीय केंद्र पुण्यात होणार

कविकुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेक-नागपूरचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्रात आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात या विश्वविद्यालयाचे उपकेंद्र स्थापन करण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून होळी आणि धूलिवंदन सणाच्या शुभेच्छा

होळी आणि धूलिवंदनाचा सण पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहात साजरा करण्याची आपली प्रथा आहे. परंतु यंदा उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आहेत.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली.

आतापर्यंत धरली तग, यापुढे जगायचे कसे?

संदीप नारंग यांची पुण्यामध्ये आठ रेस्टॅारंट होती; पण पहिल्या टाळेबंदीचा फटका इतका होता, की त्यांना तीन रेस्टॅारंट बंद करावी लागली.

टाळेबंदीच्या भीतीने खरेदीसाठी मोठी झुंबड

खरेदीसाठी आलेल्या नागरिकांनी अस्ताव्यस्त पार्किंग केल्यामुळे काहीवेळ या भागात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती.

कोरोना बाधितांना खुर्चीवरच लावला ऑक्सिजन!

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात (वायसीएम) पाचव्या आणि सहाव्या मजल्यावर कोरोनाचे रुग्ण आहेत.

कोरोनाचा जास्त संसर्ग पसरविणारे विवाह जोरात

केंद्र व राज्यातील तज्ज्ञांनी विवाह, सभा, समारंभामुळे कोरोनाचा वेगात प्रसार होत असल्याची जाणीव वारंवार करून दिली आहे.

पुण्यासाठी ऑक्सिजन आणण्याचा तुघलकी आदेश

पुण्यातील विभागीय आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांच्या विरोधानंतरही हा बदल करण्यात आला.

सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात : जलसंपदामंत्री जयंत पाटील

कात्रज कोंढवा रोड येथे नगरसेवक प्रकाश कदम यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करा

पुण्यातील विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनाबाबत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

पंढरपूर, मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा विजय

चुरशीच्या झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे अवताडे यांनी विजयाच्या दिशेने पहिल्या फेरीपासून वाटचाल केली होती.

Maratha Reservation : कोर्टाचा निर्णय दुर्दैवी, कोरोनामुळे उद्रेक शब्दही नको : खासदार संभाजीराजे

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल मान्य करावा लागतो. पण समाजाच्या दृष्टीने हे अत्यंत दुर्दैवी आहे.

पुण्यासारख्या ठिकाणी संपूर्ण टाळेबंदीचा विचार करा

राज्यात सध्या लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती बरी आहे.

पुण्याच्या महापौरांनीच खुशाल न्यायालयात जावे

पुणे शहराचे आकडे तिथे जात नाही, तर पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण अशी सर्व मिळून आकडेवारी जाते.

माझ्या अटकेमागे अजित पवार : काकडे

काकडे यांची नुकतीच भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

इलेक्शन ड्युटी पडली महागात; कोरोनाने शिक्षक कुटुंंब संपले

केवळ इलेक्शन ड्युटीला आलेल्या शिक्षकाला स्वतःसह कुटुंबातील आई, वडील व मावशीचे प्राण गमवावे लागले आहेत.

आजाराची लक्षणे दिसताच नागरिकांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

सर्वोच्च न्यायालयाने कोविड उपचाराच्या मुंबई मॉडेलची प्रशंसा केली असून, त्याच धर्तीवर शिर्डी येथे उपाययोजना करण्यात येतील.

एकतर्फी प्रेमातून तरुणीची लूट

तरुणाच्या विरोधात मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली आहे.

मालवाहतूक 110 किलोमीटर प्रतितास वेगाने होणार

प्रवासी डब्यांतील सीट काढून ती जागा मोकळी केली. त्यात दुचाकी व चारचाकी बसेल अशी जागा तयार केली.

संभाजीराव काकडे यांचे वृद्धापकाळाने निधन

जनता दलाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव टाकला.

मराठा आरक्षणाचा पोपट मेला : दवे

मराठा आरक्षणासाठी आता पुन्हा न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे.

ग्रामीण भागात कोरोना संसर्ग अधिक, ‘कोरोना केअर सेंटर’ची गरज : सभापती रामराजे नाईक निंबाळकर

गोंदवले बु. येथे सुरु केलेल्या कोरोना केअर सेंटरमध्ये 30 ऑक्सिजन बेड आणि 100 साधे बेड असणार आहेत.

’सीरम’च्या समोरील मोकळ्या जागेला आग

गवताला आग लागल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

निवृत्त उपसंचालकांकडे सापडली 88 लाखांची बेहिशेबी मालमत्ता

वकिलामार्फत एक कोटी 70 लाख रूपयांची लाच स्वीकारल्याच्या प्रकरणात वानखेडे याला अटक केली होती.

बेपत्ता महिला एक महिन्याने कुटुंबात सुखरूप परत

औंध भागातील झोपडपट्टीत त्या आपल्या परिवारासोबत राहतात.

आमदार समर्थकांना पोलिसांकडून बेड्या

आत्तापर्यंत आमदार अण्णा बनसोडेंच्या चार समर्थकांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

बिबवेवाडीत सपासप वार करून गुंडाचा खून

माधव हनुमंत वाघाटे (वय 28, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे़

सांगली जिल्ह्यातील लॉकडाऊन आणखी तीन दिवस वाढला : जयंत पाटील

जिल्ह्यात सुरू असणाऱ्या लॉकडाऊनचे आदेश 17 मे पर्यंत वाढविण्यात यावेत.

राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द : उपमुख्यमंत्री अजित पवार

‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर’ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांनासाठी सोईचे होईल.

राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द : उपमुख्यमंत्री अजित पवार

‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन सेंटर’ ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग नागरिकांनासाठी सोईचे होईल.

योग्य वेळी ताकद दाखवून देऊ ; संभाजीराजेंचा ट्विटद्वारे इशारा

माझा वारसा शिवशाहूंच्या विचारांचा आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

पुण्यातील सॅनिटायझर कंपनीत अग्नितांडव; 18 कामगारांचा मृत्यू

मुळशी एमआयडीसीतील उरवडे गावात एसव्हीएस अॅक्वा टेक्नॉलॉजिस कंपनी आहे.

येरवडा कारागृहासाठी अडीचशे कोटी खर्च अपेक्षित

गेल्या काही वर्षांपासून कारागृहात कच्च्या कैद्यांची संख्या वेगाने वाढत असल्याने कैद्यांना दाटीवाटीने राहावे लागत आहे.

सासरच्या घरासमोर विवाहितेवर अंत्यसंस्कार

माहेरच्यांनी विवाहितेचा मृतदेह नवर्‍याच्या घरासमोरच जाळला.

तर उद्रेक होईल; दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही : उदयनराजेंनी मांडली रोखठोक भूमिका

जीआर काढून इतरांना आरक्षण दिलं, मग मराठा समाजाला सुद्धा आरक्षण द्या

अकरा महिन्याच्या वेदीला दिले 16 कोटीचे इंजेक्शन

वेदिका अवघ्या आठ महिन्यांची असताना तिला ’एसएमए टाइप-1’ दुर्मीळ आजार झाल्याचे निदर्शनास आले.

वारीच्या काळात पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी

स्थानिक पोलिसांनी जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्तावही सादर केला असून लवकरच संचारबंदीचे आदेश निघण्याची शक्यता आहे.

पुण्यात सायंकाळी पाचनंतर संचारबंदी

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे वाटत असताना राज्यात कोरोनाच्या विषाणूचे नवे प्रकार समोर आले आहेत.

ओबीसी परिषदेत नेत्यांचे परस्परांवरच खापर; पहा बैठकीतील महत्वाचे ठराव

भुजबळ यांनी तत्कालीन देवेंद्र फडवणीस यांच्या सरकारचा निर्णय ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत असल्याचा आरोप केला होता.

आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

आज पहाटे आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा झाली.

सातारा जिल्ह्यातील ३७९ गावे बाधित; १ हजार ३२४ कुटुंबांचे स्थलांतर

जिल्ह्यातील एकूण 167 गावे पूर्णत: व 212 गावे अंशत: अशी एकूण 379 गावे बाधित झोलली आहेत. यामध्ये वाई तालुक्यातील 44 गावे पूर्णत: व 7 गावे अंशत: अशी एकूण 51 गावे बाधित झाली आहेत.

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन

आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केलं होतं. त्यांच्या गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती.

More News