कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयात हे २२वे ग्रामीण साहित्य संमेलन दि.२६ आणि २७ फेब्रु.रोजी होणार होते
गेल्या काही वर्षांपासून साहित्य संमेलना नगरीमध्ये स्वतंत्र अशी साहित्य प्रकाशनार्थ व्यवस्था केली जाते. त्यानुसार कुसुमाग्रज नगरीमध्येही एका स्वतंत्र साहित्य प्रकाशन कट्ट्याची सर्वसमावेशक अशी व्यवस्था केलेली आहे.
इतर भाषिक वृत्तपत्रासाठी मराठीचे हिंदी- इंग्रजीत भाषांतर करू शकणाऱ्यांनी या समितीत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वप्रथम मेडिकल इमर्जन्सी/फायर ब्रिगेड/ओन कॉल सर्व्हिस व जवळील हॉस्पिटल यांचे समवेत टायप करणे व 10 इमर्जन्सी बेड तयार करणे संदर्भात चर्चा झाली.
गप्पागोष्टी हा एक वेगळा कार्यक्रम लेखकांशी मुलांचा संवाद याअंतर्गत होणार आहे. परिसंवादांमध्ये बाल साहित्य लिहिणारे जे साहित्यिक आहेत त्या साहित्यिकांचा तो परिसंवाद असेल.
साहित्य संमेलनात जिल्ह्यातील साहित्यिकांच्या ग्रंथांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे.
संपूर्ण संमेलन सूत्रबद्धतेत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या स्वयंसेवकांच्या नियोजनाबाबत चर्चा झाली.
आ. देवयानी फरांदे यांनी सांगितले की, अ.भा. साहित्य संमेलन शहराचा उत्सव असून यासाठी नाशिक महानगरपालिकेने सक्रिय सहभाग नोंदवावा.
भारत संचार निगमने संमेलनाचे संदेश व संचार यंत्रणेसंदर्भातील प्रायोजकत्व स्वीकारून संमेलनात सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहोत अशी माहिती यावेळी झालेल्या समारंभात देण्यात आली.
नाशिक जिल्ह्याची वाड्मयीन परंपरा वाचकांसमोर आणण्याचा प्रयन्त आयोजकांनी सुरू केला आहे.
या समितीवर महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, कामगार, सार्वजनिक बांधकाम, विद्युतपुरवठा, प्रादेशिक परिवहन, अन्न व औषधे प्रशासन यांचे प्रतिनिधी आहेत.
संमेलनासाठी देण्यात येणाऱ्या १० लाखाच्या निधीचे पत्र लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष आणि संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर यांच्याकडे सुपूर्द केले.
नाशिकमध्ये होणारे साहित्य संमेलन ही नाशिककरांच्या दृष्टीने आणि तमाम महाराष्ट्राच्या दृष्टीने अभिमानास्पद घटना असून, या साहित्याच्या महोत्सवात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सक्रिय सहभाग नोंदवेल.
ऑनलाइन पद्धतीने शुल्क भरतांना आपले पूर्ण नाव, गाव, मोबाइल नंबर आणि कशासाठी शुल्क भरले याची माहिती देणे आवश्यक आहे.
या संमेलनात ज्या ज्या बाल कवींची व कथाकारंची निवड होईल त्यांना संमेलनात कविता व कथा सादर करण्याची संधी मिळेल.
उत्तर महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन व्हावे यासाठी संयोजन समिती प्रयत्नशील आहे. विविध बचत गट या ठिकाणी स्टाँल लावू शकतात. एकापेक्षा अधिक स्टॉल संयोजन समिती उपलब्ध करून देणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिनांक 26 , 27 , 28 मार्च 2021 रोजी रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येत आहे.
आज संमेलनाचे कार्यालयात आयडिया वस्तू विशारद विद्यालयाच्या विध्यार्थी यांनी आर्किटेक दिनेश जातेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या रचना आराखड्याचे दूरदृष्यं माध्यमाद्वारे सादरीकरण दिले.
नाशिककरांनी माझे नाव ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदासाठी सुचवले ही आंतरिक हाक होती अशी मनस्वी भावना ज्येष्ठ साहित्यिक श्री मनोहर शहाणे यांनी व्यक्त केली.
द्वितीय सत्रात डिजिटल युगातील पुस्तकांचे महत्त्व विषयावर परिसंवाद होईल. त्यात प्राचार्य डॉ. वेदश्री थिगळे, कवी विवेक उगलमुगले, संपादक घनश्याम पाटील, इलेक्ट्रॉनिक्स माध्यमातील किरण सोनार आदी सहभाग नोंदवतील.
नाशिक येथे हे साहित्य संमेलन होत असताना डॉ.गोऱ्हे यांना जे दहा लाख निधी साहित्य संमेलनासाठी दिले आहे त्यांचे साहित्य मंडळींकडून मोठ्याप्रमाणात स्वागत होत आहे.
नाशिक मध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर आज स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांच्या पुणे येथील निवासस्थानी संमेलनाचे निमंत्रण दिले.
संमेलन नाशिक येथे होण्यास आद्य साहित्यिक, कवी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी, कुसुमाग्रज, वसंत कानेटकर या सर्वांचे एकवलय आहे.
संमेलन अधिक निर्विग्न पार पडावे यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नोडल अधिकारी म्हणून रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे यांची नेमणूक केली आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला देशभरातून साहित्यिक येणार आहेत. याचे सगळे नियोजन करण्याची जबाबदारी स्वागतध्यक्ष म्हणून व एक नाशिककर म्हणून मी पार पाडणार आहे.
गेल्या वर्षभरापासून आपण कोविडचा लढा लढत असून परिस्थितीत झपाट्याने सुधारणा होत आहे,
26 ते 28 मार्च दरम्यान शहरातील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात हे संमेलन रंगणार आहे. हे संमेलन आगळे वेगळे कसे होईल, यासाठी लोकहितवादी मंडळ प्रयत्नशील आहे.
कविवर्य कुसुमाग्रज, वसंत कानेटकर यांनी वास्तव केलेल्या पुण्यभूमीत यंदा मराठी साहित्यिकांचा मेळा भरत आहे. याचा एक नाशिककर म्हणून मला अतिशय आनंद आहे.
आपल्या भारत देशाचे गणितज्ञ आणि खगोल वैज्ञानिक . डॉक्टर जयंत विष्णू नारळीकर हे एक थोर शास्त्रज्ञ आणि उत्तम लेखकही. विज्ञान विषयावर लेखन व विज्ञाना चा प्रभाव असलेले साहित्यलेखन सुद्धा.
नाशिकला हाेणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ, विज्ञान लेखक पद्मविभूषण डाॅ. जयंत नारळीकर यांची बहुमताने निवड झाली. या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि सामान्य वाचकांना समजेल असे विज्ञानविषयक लेखन करणारे ज्येष्ठ साहित्यिक म्हणून डॉ. जयंत नारळीकरांची ओळख आहे.
पत्रकार परिषदेत दोन दिवस चाललेल्या कामकाजाची माहिती तसेच ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीबाबत महामंडळाचा निर्णय जाहीर करणार आहेत.
विविध संस्थांचे प्रतिनिधींनी संमेलनाविषयी आपली मते मांडली. यावेळी शहरातील विविध मान्यवरांच्या हस्ते लोकहितवादी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
मराठी साहित्य संमेलनाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज शुक्रवारी गोखले एज्यूकेशन सोयायटीच्याकेम्पसमध्ये झाले
लोकहितवादी मंडळाच्या माध्यमातून संमेलन होत आहे. संमेलन नाशिकमध्ये व्हावे यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या फार्मसी कॉलेज इमारतीत महापौर सतीश कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे.
साहित्य संमेलन ही महाराष्ट्राची सांस्कृतिक पर्वणी आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हे संमेलन तिसऱ्यांदा नाशिकमध्ये होत आहे याचा आनंद वाटतो
९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत असून या पार्श्वभूमीवर महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह मनपा पदाधिकारी व साहित्य क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली.
या संमेलनात कोविड १९ चे सर्व नियमांचे पालन करण्यात येणार आहे अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष मालुंजकर यांनी दिली.
नाशिककर म्हणून आलेल्या पाहुण्यांसाठी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल.
९४व्या साहित्य संमेलनासाठी नाशिकची दोन, सेलूचे एक, पुण्याचं एक आणि अंमळनेरवरुन एक अशी निमंत्रणे आली होती.
दिल्लीबाबत महामंडळाने आधीच निर्णय घेतला आहे. दिल्लीत स्थळ पाहणी होणार नसून नाशिक मध्ये आम्ही फक्त गोखले एज्यूकेशन अभियांत्रिकी महाविद्यालयाची पाहणी केली आहे.