विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस शिल्लक असताना भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
महिंद्रा कंपनी व इगतपुरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.
नंदुरबार : विधानसभा निवडणूकीत मतदानाच्या टक्केवारीत जिल्ह्याला प्रथम स्थान मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषद शाळांनी या उपक्रमात मोठ्या संख्येत सहभाग घेतला असून गावागावातून मतदानाचा जागर होत आहे.
नाशिकसह महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार आज सायंकाळी संपुष्टात आला. आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे ते 21 तारखेला होणाऱ्या मतदानाकडे.
नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयाची व्होलीबॉल खेळाडू सपना गरगटे हीची पुणे विद्यापीठाच्या संघात नीवड झाली आहे.
गेल्या आठवड्यापासून परतीच्या पावसाने शेकऱ्यांचे चांगलेच नुकसान केले असून बुधवारी संपूर्ण जिल्ह्यात पावसाने चांगलेच थैमान घातले असून ठिक-ठिकाणी मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
आमच्या हातचं पीक गेलंय... खूप नुकसान झालंय... जगावं की मरावं असा प्रश्न आमच्यासमोर आहे असं सांगतानाच सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही अशी माहिती नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पाहणी करण्यासाठी शेताच्या बांधावर गेलेल्या शरद पवार यांना सांगितली.
शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी सरकारने हातभार लावला पाहिजे. सरकारने तशी भूमिका घेतली नाहीतर आम्ही याविरोधात ठोस भूमिका घेऊ असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.
मुंबई : आज सायंकाळी शिवाजी पार्क येथे झालेल्या भव्य समारंभात राज्याचे २९वे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह त्यांचे बंधू राज ठाकरे यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील दिग्गज नेते उपस्थित होते.
राज्यात काल दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के आहे.
माजी परराष्ट्रमंत्री स्व.सुषमा स्वराज यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त प्रदेश कार्यालयात त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
केंद्र शासनाने 15 व्या वित्त आयोगातंर्गत ग्रामपंचायतींना देण्यात येणाऱ्या निधीमधील बंधीत स्वरूपातील निधी हा सद्यस्थितीत पाणीपुरवठ्याच्या कामांसाठी प्राधान्याने वापरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.
लॉकडाऊननंतर आलेल्या लाईटबिलमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. कोरोनामुळे आर्थिक संकट असताना वीजबिलाने शॉक दिले आहे.
नांदेड जिल्ह्यामध्ये माळेगाव(यात्रा) या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली.
वंदेभारत’ अभियानांतर्गत ४४८ विमानांनी आतापर्यंत मुंबईत ६१ हजार ०४२ प्रवासी आले असून यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या २० हजार ७६८ आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविडसंदर्भात कलम १८८ नुसार २ लाख २३ हजार गुन्हे दाखल झाले आहेत.
ग्रामीण भागातील शिक्षणव्यवस्थेमध्ये बदल घडवून भारताचा चांगला नागरिक घडविण्यासाठी शासन प्रयत्नशिल असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज व्यक्त केले.
भाजपाचे नेते व खासदार नारायण राणे हे पत्रकार परिषद घेऊन आपले परखड मत व्यक्त करत महाविकास आघाडी व शिवसेनेवर निशाणा साधताना दिसतात.
आदिवासी बांधवांनी नेहमीच निसर्गाशी एकरूप होत त्याचे संवर्धन केले आहे. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या खाद्य संस्कृतीतही दिसून येते.
धुळे जिल्ह्यात यंदाही मोसमी पावसाने आतापर्यंत चांगली हजेरी लावली आहे. ही समाधानाची बाब म्हटली पाहिजे.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३३ लाख ३७ हजार ८४८ नमुन्यांपैकी ६ लाख २८ हजार ६४२ नमुने पॉझिटिव्ह (१८.८३ टक्के) आले आहेत.
सन २०१५ ते सन २०१९ या प्रवेशसत्रात प्रवेशासाठी उपलब्ध जागांच्या सरासरी २.२५ पट अर्ज प्राप्त झाले होते.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक नागरिकाने मास्कचा वापर करावा.
एकनाथ खडसे त्यांच्या 68 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना खडसेंनी स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता जोरदार टीकास्त्र सोडलं आहेे.
गेल्याच महिन्यात आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने घटनापिठाकडे सोपवले. मात्र, त्या आरक्षणाच्या अंमलबजावणीवर कोणताही अंतरिम निर्णय दिला गेला नाही.
माझ्याविरुद्ध देवेंद्र फडणीस यांनी षडयंत्र रचले, मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला, हे नाव घेऊन सांगतो.' असा गंभीर आरोप माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केला.
‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गाव, पाड्यापर्यंत आरोग्य विभागाचे पथक पोहोचेल. हे पथक प्रत्येक नागरिकाची आरोग्य तपासणी करेल.
राज्यातील सर्व विशेष शाळेतील शिक्षक व अन्य कर्मचाऱ्यांना ‘शीघ्र निदान व शीघ्र उपचार’ या उपक्रमाचे ५ दिवसीय प्रशिक्षण वेबिनारद्वारे देण्यात येत आहे.
जिल्ह्यात आज तब्बल ८४० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २८ हजार ५१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८४.३२ टक्के झाले आहे. गेल्या २४ तासांत रूग्णसंख्येत ९०६ ने वाढ झाली.
धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 11 हजार 209 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी नऊ हजार 704 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सतत मास्क घालणे आवश्यक आहे. मास्क शिवाय घराबाहेर पडू नये. दर दोन ते तीन तासांनी हात साबण किंवा सॅनेटायझरने स्वच्छ धुवावेत. नाक, तोंड, डोळे यांना वारंवार हात लावू नयेत.
राज्यात सर्वत्र टेलिआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियानांतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
सर्वेक्षणात आरोग्य पथकांनी जिल्ह्यातील 3 लाख 66 हजार 641 घरांना भेटी दिल्या. एकूण 18 लाख 72 हजार लोकसंख्येपैकी 16 लाख 73 हजार नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले.
‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहिमेचे किट वितरण, कोरोना कालावधीत उल्लेखनीय सेवा बजावल्याबद्दल आशा स्वयंसेविका यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘माझे कुटुंब- माझी जबाबदारी’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत आढळून येणाऱ्या को- मॉर्बिड रुग्णांच्या आरोग्याकडे लक्ष ठेवावे. त्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी.
कोरोनाबाधित रुग्णांना पुरेसा ऑक्सिजन उपलब्ध व्हावा म्हणून वैद्यकीय महाविद्यालयातील ऑक्सिजन टँकचे काम तातडीने पूर्ण करावे.
रविवार आणि सोमवार असे दोन दिवस खासदार शरद पवार मराठवाड्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांना भेटी देत आहेत.
नव्याने होणाऱ्या या पदभरतीत आय.टी. आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. याशिवाय अभियांत्रिकी पदवीधारकांनाही नोकरीची संधी या भरतीत निर्माण होणार आहे.
शहादा तहसिल कार्यालयात कोविड-19 आणि जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अमळनेर येथील कार्यक्रम आटोपून एकनाथ खडसे आपल्या वाहनाने जळगावकडे परत येत होते.
नाशिक येथील पदाचा कार्यभार घेतल्यापासून सन 2013 पासून व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचे बुडविलेले पाच कोटी रुपये मिळवून दिले.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगावात भारतीय जनता पक्षाला राजकीय हादरे देण्यास सुरुवात केली आहे.
कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मत्स्यपालनाला प्रोत्साहन देण्यात यावे. नागरिकांना त्यासाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात यावी. स्थलांतराची नोंद ग्रामपंचायतस्तरावर घेण्यात यावी.
जलतरण तलावाला स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. त्यामुळे या सुविधेच्या माध्यमातून सर्वोत्तम खेळाडू घडविण्याचे उद्दीष्ट ठेवावे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणारे खेळाडू तयार करावेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येताना अहमद पटेल यांच्या मार्गदर्शनाचा आणि अनुभवाचा आम्हाला खूप उपयोग झाला
दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात यश देशमुख शहीद झाले. त्यांच्या कुटुंबियांप्रति राज्य शासनाच्या सहवेदना असून यश यांच्या कुटुंबियांना राज्य शासनाच्या वतीने एक कोटी रुपयांची मदत करण्यात येईल.
बीएचआरचा साधारण 1100 कोटी रूपयांचा घोटाळा आहे. याबाबत 2018 मध्ये ॲड. किर्ती पाटील यांनी राधा मोहन यांच्याकडे तक्रार दाखल केली होती.
काँग्रेसचं संख्याबळ 157 असतानाही पाटील यांना 98 च मते मिळाली आहेत.
केंद्र सरकारने यापूर्वीही मला दोन वेळेस लेखी आश्वासन दिले असतानाही ते पाळलेले नाही. केंद्र सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे, असा आरोप अण्णा हजारे यांनी यावेळी केंद्र सरकारवर केला.
आज तुम्ही 81 व्या वर्षात पदार्पण करत आहात. तुमचा वाढदिवस म्हणजे आम्हा कार्यकर्त्यांसाठी एक आनंदोत्सव असतो. यानिमित्त तुम्हाला काय भेट द्यावी, असा खूप विचार केला, पण काही सुचत नव्हतं.
निवडणूक आयोगाने ग्रामपंचायती निवडणुकांचा कार्यक्रम जाहिर केला आहे. यामध्ये नाशिक विभागात एकूण 2 हजार 476 ग्रामंपचायतीमध्ये निवडणुका होणार आहेत.
कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत शेतकर्यांचे आंदोलन सुरू आहे. त्याचदरम्यान शेतकरी प्रश्नांवर आंदोलन करण्याचा इशारा हजारे यांनी दिला होता.
भोसरीचा भूखंड मी नाही माझ्या पत्नाने खरेदी केलेला आहे. त्या ठिकाणचा व्यवहार हा रेडीरेकनरच्या दराप्रमाणे पाच कोटींचा आहे,
नोकरी घालविण्याची भीती दाखवून दहा लाख रुपयांची खंडणी मागितली आणि ती न दिल्याने वृत्तपत्रात बातम्या प्रकाशित करून आपली बदनामी केली.
पुण्यातील भोसरी या ठिकाणी असलेल्या भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात ईडीने माजी मंत्री आणि खडसे यांना नोटीस बजावली.
अॅमेझॉन, स्विगी , झोमॅटो नंतर आता डोमिनोजच्या जुबिलियन्ट फूड वर्क कंपनीनेदेखील आपल्या अॅपमध्ये मराठी भाषा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या सुरू असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काही ठिकाणी पदांचे लिलाव झाल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यासंबंधी हजारे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील तरुणी आरती भोसले आणि प्रशांत पाटील या दोघांमध्ये प्रेम संबध होते. या प्रेम संबंधातून या दोघांनी गेल्या आठवड्यात प्रेम विवाह केला.
जरे यांच्या हत्येला महिना उलटूनही आरोपी बाळ बोठेला अद्याप अटक झालेली नाही. त्याविरोधात अहमदनगरमध्ये तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.
‘मराठी लोकरंगभूमी’चे लेखक प्राचार्य डॉ. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. गेल्या पस्तीस वर्षांचे अध्ययन आणि अध्यापनाच्या चिंतनामधून निर्माण झालेल्याचे फलित या ग्रंथातून मांडले आहे.
सध्या विद्यार्थ्यांचा कल इंग्रजी भाषेकडे आहे. घरोघरीही विद्यार्थी मराठीतून बोलतात. मात्र, त्यात इंग्रजीचाही वापर केला जातो.
कोरोना लसीकरण मोहिमेसाठी सर्व केंद्रांनी प्राथमिक तयारी यापूर्वीच पूर्ण केली होती. आरोग्य विषयक जनजागृती करणारी रांगोळी आरोग्य केंद्राच्या बाहेर रेखाटण्यात आली होती.
कोविड 19 लसीकरण मोहीम जिल्हा रुग्णालय, धुळे, उपजिल्हा रुग्णालय, शिरपूर, ग्रामीण रुग्णालय, साक्री व प्रभातनगर- धुळे शहर, असे 4 शीतसाखळी केंद्रांवर राबविण्यास आजपासून सुरवात झाली.
देशाच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण आहे. कोरोना संकट काळात ज्यांनी धैर्याने कर्तव्य बजावले अशा आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रथम कोरोना लस देण्यात येत आहे.
पवार यांच्या नेतृत्वाखालील आदर्श ग्राम विकास पॅनलचे उमेदवार पोपटराव पवार, विमल ठाणगे, विठ्ठल ठाणगे, मीना गुंजाळ, सुरेखा पादिर, रोहिदास पादिर, रंजना पवार हे सर्वजण विजयी झाले आहेत.
राज्यात महाविकास आघाडीने भाजपाला जोरदार धक्के देत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच ग्रामपंचायत निवडणूका जाहीर झाल्या
बोठे याच्या जामीनअर्जावर खंडपीठात सोमवारी सुनावणी झाली. या वेळी सरकारी व आरोपी पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने तत्काळ निर्णय देत बोठे याचा जामीन फेटाळला.
ऐवज लुटल्यानंतर दरोडेखोरांनी दाम्पत्याचे मोबाईल खाली गेटजवळ ठेवून पोबारा केला.
साहित्य आणि संस्कृती हेच खरे शाश्वत धन असते. आपल्या विद्वत्तेमुळे विद्वानाला सर्वत्र मानाचे स्थान असते. ॲलेक्झांडरसारख्या सम्राटालाही विद्वत्तेसमोर झुकावे लागले होते.
राज्यपाल महोदयांच्या आगमनानिमित्त आदिवासी बांधवांनी गेर, शिबली आदी नृत्य सादर केली. नृत्याचा आनंद घेताना श्री. कोश्यारी यांनी नृत्यास भरभरुन दाद दिली
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना सर्वांनीच चांगली कामगिरी बजावली आहे. ते सर्वजण अभिनंदनास पात्र आहेत.
खासदार नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन शाह यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा उल्लेख तीन चाकी ऑटोरिक्षा सरकार असा करत सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे बर्ड फ्लूचे अहवाल सकारात्मक आल्यानंतर या ठिकाणी कोंबड्या मारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.
भविष्यात अशी घटना होऊ नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना त्वरीत राबवाव्यात. बाधित क्षेत्रातील अन्य पोल्ट्री फार्ममधील नमुने तपासणीसाठी त्वरीत पाठवावे.
राज्याचे नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आज नगरला येणार होते; मात्र त्यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आसून ते आता उद्या (शुक्रवारी) येणार आहेत.
कोरोना विषाणूचा प्रभाव कमी असला, तरी नियमावली बंधनकार असल्याने यंदाचा शिवजयंती उत्सवदेखील साध्याच पद्धतीने साजरा करावा लागणार आहे.
शारदा ही अकरावीत शिक्षण घेत होती. घर सारवत असताना अचानक सापाने शारदाला दंश केला. काहीतरी चावल्याने शारदाने आरडाओरडा केला. त्यामुळे आजूबाजूचे नागरिक धावून आले.
राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी डॉ. प्रशांतकुमार पाटील यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली.
महाराष्ट्र राज्य साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. किसन पाटील (वय 67) यांचे मंगळवारी (2 मार्च) दुपारी साडेचारच्या सुमारास अल्प आजाराने निधन झाले.
विधानपरिषद सदस्य मनीषा कायंदे व प्रसाद लाड यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्यावर उत्तर देताना गृहमंत्री बोलत होते.
30 नोव्हेंबर 2020 रोजी रात्री साडेआठच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात जरे यांची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली.
एकनाथ खडसे हे भाजपतील मुरब्बी आणि ज्येष्ठ नेते होते. ते स्पर्धेत आल्यामुळे फडणवीस यांनी त्यांना दूर सारले. महाजन यांना सारी ताकद दिली. सत्तेच्या पाच वर्षांच्या काळात उत्तर महाराष्ट्रात महाजनांचाच शब्द अंतिम असायचा.
जळगाव महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाच्या होणार्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.
महापालिकेत भाजपला असणारे भक्कम बहुमत पाहता महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक बिनविरोधी होण्याची शक्यता होती. पक्षाचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी या पदांसाठी अर्ज घेतानादेखील असाच दावा केला होता.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन लसीकरणाची माहिती घेतली. त्यांनी लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी चर्चा केली.
रेखा जरे हत्याकांडातील आरोपी पत्रकार बाळ बोठे यांच्या घरातून शुक्रवारी अनेक वस्तू हस्तगत केल्या आहेत. यामध्ये असलेला आयपॅड हा सुद्धा आता तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात येणार आहे.
बोठे याची जरे खून प्रकरणात गुरुवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर त्याचे वकील अॅड. ठाणगे यांनी न्यायालयात अर्ज केला
मुक्ताईनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी फोन टॅप करण्यात आल्याचे सांगितले.
शासनाच्या आदेशान्वये १६ नोव्हेंबर पासून साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्यात आलेले आहे.
जळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौरपदासाठी नुकतीच ऑनलाईन निवडणूक झाली. यामध्ये बहुमत नसतानाही शिवसेनेने भाजपचे तब्बल 27 नगरसेवक फोडून महापलिकेवर आपला महापौर, उपमहापौर निवडून आणला.
मला वाटते त्यांना रात्री बेरात्री सत्ता कधी येईल, याची त्यांना स्वप्न पडत असतील; पण सध्या सरकार पडणार असल्याचे ते सांगत आहेत.
जिल्ह्यामध्ये रेमडेसिव्हिरचे इंजेक्शन्सचे नियोजन कशा पद्धतीने करायचे याचा आराखडा प्रशासन करीत आहे.
मुलांना समस्येवर मात कशी करायची याचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांनी आपल्या याच अनुभव आणि ज्ञानाचा उपयोग करीत जनजागृतीचे काम सुरू ठेवेले आहे.
काही दिवसांपूर्वी विखे यांनी विमानाचा व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यामध्ये त्यांनी इंजेक्शन घेऊन आलोय व सर्वसामान्यांनाही देणार असल्याचे म्हटले होते.
डॉ. विखे यांनी आपल्या मैत्रीचा वापर करीत थेट विशेष विमानाने रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा साठा नगर जिल्ह्यात आणला.
गोपीनाथ मुंडे यांचा छळ करण्यात आला. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करण्यात आले.
चौधरी दाम्पत्य घरात झोपलेले असताना रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.
जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी झाली, तरी आरोग्य यंत्रणेने अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्यांवर भर द्यावा.
मागील वर्षीचे शिक्षण ऑनलाईन झाल्यानंतर परीक्षा न घेता सर्वांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
हॅनी ट्रॅपसंदर्भांतील हा नगर जिल्ह्यात पहिला गुन्हा नगर तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाला.
जखणगाव ’हनीट्रॅप’ व त्याद्वारे ब्लॅकमेलिंग करण्याच्या प्रकाराचे गूढ दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे.
मुक्ताई नगरपालिकेतील नगरसेवकांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने भाजपला हा एक मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रस्थान सोहळ्याचे सोशल मीडियाद्वारे लाईव्ह प्रसारण करण्यात आले होते.
जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन अठरा वर्षाच्या पुढील युवक-युवतीपासून पुढील सर्व वयोगटातील लोकांना लसीकरण करणं आता शक्य होणार आहे.
अजिंक्यच्या वडीलांना सिगारेट पिण्यास श्रीराव विरोध करीत होते.
आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामात त्रृटी असल्याने त्रयस्थ यंत्रणेमार्फत बांधकामाची चौकशी करण्यात यावी.
वृक्षारोपणाचा कार्यक्रम पितृदिनाच्या औचित्याने पिंप्राळा येथील स्मशानभूमीत 20 जून रोजी सायंकाळी झाला.
एरंडोल येथे साहित्य वाचनाभिरुची असलेल्या समाजशील महिलांनी एकत्र येऊन प्रथमतःच 'पुस्तक भिशी'ची स्थापना केली.
काही जिल्ह्यांमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. अशा जिल्ह्यांनी बाह्य स्रोतांद्वारे /कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे.
सत्कार अभियानाचा शुभारंभ प्रख्यात नेत्रतज्ज्ञ डॉ. धर्मेंद्र पाटील यांच्या क्लिनिकपासून करण्यात आला.
मला माफ करा… 100 जीव वाचवायचे होते. पण डोनेशन करून 72 राहिले. जमलं तर इतरांपर्यंत पोहचवा. अनेक जीव वाचतील.
सत्कारार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासात माता-पित्यांचा सहभाग कसा मिळाला याबाबत भावना व्यक्त करीत आपले यश माता-पित्यांना समर्पित केले.
मुलगा ऋषीसह दोन्ही मुली दीपाली व सोनाली तसेच नात सिद्धी यांनी त्यांच्या पार्थिवाला अग्निडाग दिला.