विदर्भ

  • Home
  • विदर्भर

All News

विजयादशमी उत्सव 2019 के अवसर पर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत जी के उद्बोधन का सारांश -

आदरणीय प्रमुख अतिथि महोदय, इस उत्सव को देखने के लिए विशेष रूप से यहां पर पधारे हुए निमंत्रित अतिथि गण, श्रद्धेय संत वृंद, मा. संघचालक गण, संघ के सभी माननीय अधिकारीगण, माता भगिनी, नागरिक सज्जन एवं आत्मीय स्वयंसेवक बंधु.

सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणी मंत्रिगटाची स्थापना करण्यात यावी - महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमची मागणी

सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणी मंत्रिगटाची स्थापना करण्यात यावी - महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमची मागणी

'पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह' : 29 जणांना सुट्टी

यवतमाळ, दि. 26जुलै 2020 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात तसेच विविध ठिकाणी कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेल्या 29 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना आज (दि.26) सुट्टी देण्यात आली. तर जिल्ह्यात रविवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला असून 25 पॉझेटिव्ह रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

आज नवे तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर दोघे कोरोनामुक्त

आज नवे तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर दोघे कोरोनामुक्त गोंदिया दि.26 जुलै 2020 (जिमाका वृत्त ) जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून आज रविवारी आणखी तीन नवे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याचे निदान गोंदियाच्या प्रयोगशाळेच्या अहवालातून झाले,तर दोन रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहे.

भविष्यात डिजिटल माध्यमातून साहित्य प्रकाशित होणे स्वागतार्ह* - नितीन गडकरी

भविष्यात डिजिटल माध्यमातून साहित्य प्रकाशित होणे स्वागतार्ह* - नितीन गडकरी नागपूर : १ ऑगस्ट - २१ वे शतक हे डिजिटल क्रांतीचे युग आहे. डिजिटल माध्यमात आता साहित्यही उपलब्ध होऊ लागले आहे. अशा वेळी मराठी पत्रकार आणि लेखकांनी मुद्रित माध्यमाच्या मागे न लागता आपले साहित्य डिजिटल माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच स्वागतार्ह ठरतो असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जलवाहतूक व जहाजबांधणी, लघु व मध्यम उद्योग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आज केले. नागपुरातील जेष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक तसेच नागपूर इन्फोचे संपादकीय सल्लागार अविनाश पाठक लिखित थोडं आंबट थोडं गोड या ललित लेख संग्रहाच्या डिजिटल आवृत्तीचे प्रकाशन आज नितीन गडकरी यांचे हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात झाले, त्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी लेखक अविनाश पाठक, अनुरूपा पाठक, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बालरोगतज्ज्ञ डॉ. उदय बोधनकर, माजी राज्यसभा सदस्य आणि मध्य भारतातील आघाडीचे उद्योगपती अजय संचेती प्रभृती उपस्थित होते.

खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण

राणा कुटुंबियांवरील कोरोना संकट आज अधिक गडद झालं असून खासदार नवनीत राणा यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.सुभाष चौधरी यांची नियुक्ती

प्रभारी प्र-कुलगुरू डॉ.सुभाष रामभाऊ चौधरी यांची नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या  कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

वैमानिक विंग कमांडर दीपक साठे यांच्या कुटुंबियांचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचेकडून सांत्वन

कोझिकोड येथील विमान दुर्घटनेत नागपूरचे सूपुत्र वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नागपूर पोलिसांची कामगिरी प्रशंसनीय – गृहमंत्री अनिल देशमुख

शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम नागपूर शहर पोलीस उत्तम प्रकारे करीत आहेत.

आरोग्य सुविधांना प्राधान्य हीच राज्य शासनाची प्राथमिकता – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरेानामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. बहुतेक सर्वच कामांमध्ये ‘ऑनलाईन’ तंत्राचा वापर होऊ लागला आहे.

अमरावती जिल्ह्यात स्टार्टअप्सला प्रोत्साहन द्यावे – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

राज्यातील ग्रामीण भागात आयटीआयच्या माध्यमातून स्टार्टअप पार्कची स्थापना करण्याचे शासनाचे नियोजन असून, जिल्ह्यातही स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी उपक्रम राबवावेत

भेसळयुक्त इंधन पुरवठ्याची तात्काळ चौकशी करा – विधानसभाध्यक्ष नाना पटोले

देशात कोणत्याही पेट्रोलियम पदार्थाची विक्री करताना भारतीय मानक ब्युरोने दिलेल्या दिशानिर्देशाचे पालन करणे आवश्यक आहे.

अलविदा रॉकी : गृहमंत्री अनिल देशमुख

महाराष्ट्र पोलिस दलातील तंत्रशुद्ध प्रशिक्षणाने तयार झालेले श्वान हजारो नागरिकांचे जीवन वाचविण्याचे काम करत आले आहेत.

महामंडळाच्या योजनेचा ओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन

या योजनेअंर्तगत महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता, लघु उद्योग सुरु करण्यासाठी 1 लाखाची विना व्याज थेट योजना सुरु केली आहे.

''त्यांना धरून चोपलं पाहिजे'' त्याशिवाय ते सुधारणार नाही : राज्यमंत्री बच्चू कडू

सोयाबीन पिकाची पाहणी करण्यासाठी खुद्द राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली.

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना कोरोनाची लागण

मागील १४ दिवसांच्या काळात जे कोणी माझ्या संपर्कात आले असतील त्यांनी चाचणी करून घ्यावी अशी विनंती आयुक्तांनी केली आहे.

नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची बदली!

तुकाराम मुंढे हे प्रशासकीय शिस्तीचे आणि धडाडीने निर्णय घेणारे अधिकारी म्हणून ओळखले जातात.

महानिर्मिती तंत्रज्ञ-३ पदासाठी २ सप्टेंबरपासून मूळ कागदपत्रे तपासणी

तंत्रज्ञ-३ या पदाच्या उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीअंती पात्र/अपात्र उमेदवारांची यादी महानिर्मितीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

माझी तब्येत स्थिर, लवकरच कोरोनावर मात करेन

फेसबुक पोस्टद्वारे नागरिकांना नागपूरचे माजी आयुक्त आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव तुकाराम मुंढे यांनी खास आवाहन केलं आहे.

ठाकरे सरकारकडून अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धंदा

शासन फक्त बदल्यांच्या मागे लागले आहे. बदल्या करणे हा एकमेव धंदा शासनात चालला आहे.

राज्यभरात विजेच्या मागणीत सुमारे २००० मेगावॉटने वाढ – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

विजेच्या मागणीत सुमारे २००० मेगावॉटची वाढ झाली असल्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले.

नागपूर पूरपरिस्थितीमुळे नुकसानग्रस्त व्यक्तींना १६ कोटी ४८ लाख रुपयांच्या अर्थसहाय्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

पुरामुळे अनेक ठिकाणी नागरिकांची घरे पाण्यात बुडाली होती, घरांचे, घरातील वस्तूंचे नुकसान झाले होते. काही ठिकाणी झोपड्याही नष्ट झाल्या होत्या.

विदर्भ, मराठवाड्यातील प्रलंबित कृषीपंप वीज जोडण्या देण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून कर्ज घेणार

एचव्हीडीएस योजनेसाठी राज्यात ५ हजार ४८ कोटी रुपये मंजूर केलेले असून पंजाब नॅशनल बँक व बँक ऑफ बरोदाकडून २ हजार ८०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे.

नागपूर फुटाळा तलाव येथे प्रस्तावित बुद्धिस्ट थीम पार्क प्रकल्पाचे सादरीकरण

प्रस्तावित बुद्धीस्ट थीम पार्क प्रकल्पाला अंदाजे १ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाकडे जगातील सर्व बुद्धिष्ट राष्ट्रे आकर्षित होणार असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देतील व यामुळे नागपूर हे पर्यटनाचे जागतिक केंद्र तयार होऊ शकेल.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणाकरिता संबंधीत विभागांसमवेत आवश्यक उपाययोजना

ताडोबा अभयारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्रामधील गावांच्या अडीअडचणी व त्या सोडविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या अनुषंगानेही बैठक घेण्यात आली.

वन अधिकारी-कर्मचाऱ्यांना हौतात्म्य आल्यास सानुग्रह अनुदानाची योजना मंत्रिमंडळासमोर आणणार

वन्यजीव व वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करणे ही वन विभागाची प्राथमिकता आहे. त्या अनुषंगाने राज्यात वन अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत आपण वन्यजीव व वनसंपदेचे संरक्षण व संवर्धन करत आहोत.

जनतेला योग्य उपचार देणे आमची सर्वोच्च जबाबदारी - ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

कोरोनावर मात करण्यासाठी एस.एम.एस.(सोशल डिस्टंसिंग, मास्क आणि सॅनीटायझर) हे प्रभावी उपाय आहेत. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर किमान १४ दिवस लॉकडाऊन लावावा लागेल.

संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी किसान रेल सुरु करण्यासंदर्भात नितीन गडकरी यांनी घेतली महत्वूपर्ण बैठक

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांग्लादेश ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. वार्षिक उत्पन्नाच्या दोन तृतीयांश सुमारे अडीच लाख टन संत्री दरवर्षी बांग्लादेश येथे निर्यात करण्यात येतात. मात्र थेट रेल्वेची सुविधा नसल्याने रस्त्याने संत्र्यांची मालवाहतूक होते.

पूर्णत्वाकडे पोहोचलेल्या व प्रलंबित जलसंपदा प्रकल्पांची माहिती सादर करावी ⁃ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या विनंतीवरून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राजभवनवर बैठक आयोजित करण्यात आली होती.

विकास झाडे व गजानन निमदेव यांना अनिलकुमार स्मृती पुरस्कार प्रदान

गजानन निमदेव यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या व जीव गमावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबासाठी कोविड निधी म्हणून पुरस्काराची राशी पत्रकार संघाला दान केली.

नागपूरमध्ये उभारणार ॲग्रोटेक सेंटर – ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत

नागपूरमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित ॲग्रोटेक सेंटर उभारण्यासंदर्भात डॉ.राऊत यांची मुंबईत टाटा टेक्नोलॉजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक झाली.

रेल्वे वॅगन निर्मिती प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करा – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

रेल्वे वॅगन निर्मिती प्रकल्पाच्या कामाला 2017 मध्ये सुरुवात झाली आहे. या प्रकल्पाच्या निर्मितीमुळे स्थानिकांना रोजगाराची संधी मिळेल, यासाठीही प्रयत्न व्हावा व प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी.

नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करा, पालकमंत्री शिंगणे यांचे निर्देश

कृषी व महसूल यंत्रणेने गाव पातळीवरील आपली यंत्रणा सजग करावी. प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतीचा पंचनामा करावा. एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटता कामा नये.

पांढरकवडा येथील वाघिणीस सुरक्षितरित्या पिंजराबंद करण्यात यश

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या कार्यवाहीवर स्वतः लक्ष ठेवून होते व वेळोवेळी मार्गदर्शन करत होते. या कार्यवाहीत भाग घेतलेल्या सर्व वन अधिकारी व कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक यांचे मी आभार मानतो व कौतुकही करतो.

भंडारा येथे आरटीपीसीआर प्रयोगशाळेला मंजुरी – आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे

कोविड-19 चे लक्षणं असलेल्या संशयीत रूग्णांचा स्वॅब घेतल्यानंतर तो तपासण्याची सुविधा भंडारा येथे नव्हती. स्वॅब नागपूर येथे तपासणीसाठी पाठवावे लागत आहेत.

बुलडाणा येथे राज्य परिवहन मंडळाच्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा

मंत्रालयात परिवहनमंत्री ॲड. परब यांच्या दालनात झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोळ म्हणून बुलडाणा जिल्ह्याची ओळख आहे.

नागपूर विभागातील पूरग्रस्तांसाठी १६२ कोटी ८१ लाख ७ हजाराचा निधी मंजूर

मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाण्याच्या विसर्गामुळे गोसेखुर्द प्रकल्पातील सर्व दरवाज्यांमधून ५ मीटरपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

महात्मा गांधींची ग्रामराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरविणे महत्त्वाचे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

काळाला आपल्या कामातून दखल घ्यायला लावणारी थोर व्यक्तिमत्त्वेच महात्मा होतात. सेवाग्राम येथून स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात झाली.

सलग पाच तास सूत कताईच्या माध्यमातून गांधीजींना आदरांजली

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अमरावती कार्यालय व कस्तुरबा सोलर खादी महिला समिती यांच्या संयुक्त विद्यमाने गांधीजयंतीनिमित्त २५ चरख्यांवर सलग पाच तास सूत कताई करून महात्मा गांधीना अनोखी आदरांजली अर्पण करण्यात आली.

नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती तालुक्यातील २१ लाभार्थी व पूर्णानगर येथील एका लाभार्थ्याला पालकमंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप शासकीय विश्रामगृह येथे आज करण्यात आले.

होम आयसोलेशन रुग्णांना अचूक वैद्यकीय सल्ला मिळण्यासाठी पुढाकार घ्या

शहरातील खाजगी हॉस्पिटलचा वाढलेला सहभाग, लोकांच्या घरापर्यंत जाऊन चाचणी करण्याचा सुरु करण्यात आलेला उपक्रम, वाढविण्यात आलेल्या चाचणीची संख्या, डॅशबोर्डवर माहितीची वॉररूमची माहिती दिली.

अमरावती जिल्ह्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची पुनर्मांडणी करणार

पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री श्री. पाटील म्हणाले , या योजनेअंतर्गत आवश्यक कामांसाठीची प्रशासकीय मान्यता यापूर्वी देण्यात आली आहे.

गांधीजींची विचारसरणी जगभर पोहोचवण्याची गरज

कार्यक्रमात मुख्य वक्ते लंडनचे सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ, गांधीवादी विचारवंत, पद्मभूषण प्रा. भिखू पारेख यांनी जागतिक सभ्यतेसाठी गांधीजींच्या मूल्यांचे अनुसरण करण्याची आजच्या समाजाची गरज असल्याचे सांगितले.

किसान रेल्वेमुळे शेतक-यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन - नितीन गडकरी

कृषी- माल वाहतूक नोंदणीसाठीच्या मध्य रेल्वेच्या ‘संत्रा किसान रेल्वे’ वेबसाईटचे सुद्धा लोकार्पण यावेळी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आलं.

मंत्री यशोमती ठाकूर यांना पोलिसाला मारणे भोवले, ३ महिन्यांची शिक्षा, जामीन मंजूर

पोलिस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अमरावती न्यायालयाने दोषी ठरवत ३ महिन्यांची शिक्षा आणि १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

जिल्ह्यातील पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या गावांमधील पीक नुकसानाचे पंचमाने करण्यासाठी तलाठी, कृषि सहाय्यक व ग्रामसेवक यांची पुरेशी पथके तयार करावीत.

कोरोनाविरुध्दच्या लढाईत पोलिस ‘फ्रंटलाईन वॉरीअर्स’ – पालकमंत्री संजय राठोड

पोलिस मुख्यालयात जिल्हा पोलिस तसेच त्यांच्या कुटुंबियांकरिता निर्माण करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरचे लोकार्पण करताना ते बोलत होते.

शंकुतला रेल्वे इंजिनचे केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते लोकार्पण

सरकार सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असून अकोला रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी दीडशे कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे.

पक्षासाठी चिंतनाची बाब : सुधीर मुनगंटीवार

मनाविरुद्ध घडत असतानाही काम करणं म्हणजे भारतीय जनता पक्ष, असे प्रमोद महाजनांनी म्हटलं होतं. एकनाथ खडसेंनी त्या प्रमोद महाजनांसोबत काम केलंय.

चंद्रपुरातील चांदा येथे आरटी-१ वाघ जेरबंद

गेल्या काही महिन्यांत या आरटी-१ वाघाच्या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता, तर तिघे जखमी झाले होते. दोनच दिवसांपूर्वी हा वाघ पिंजरा तोडून पळाला होता, पण पुन्हा आज त्याला सापळा लावून पकडण्यात आले.

महसूल, शेतीविषयक कामांना गती द्या – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात

सध्या कोरोना नियंत्रणात असला तरी नागरिकांनी बिनधास्तपणे वागू नये. येणाऱ्या दिवसांत थंडी वाढल्यानंतर पुन्हा एकदा संसर्गाची शक्यता नाकारता येत नाही.

पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ डिजिटल प्लॅटफॉर्म

कोरोना साथीच्या काळात स्तनदा माता, लहान बालके अशा 74 लाख लाभार्थ्यांना पोषण आहार पोहोचवण्यात आला. या साथीच्या काळात अनेक अडचणी ठिकठिकाणी उभ्या राहिल्या होत्या.

अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिवाळीत केली स्वीटमार्ट व हॉटेल्सची तपासणी

ज्या दुकानदारांनी नियमांचे पालन केलेले नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश मंत्री महोदयांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

गडचिरोलीतील नक्षलग्रस्त भागांतील पोलिसांसोबत गृहमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी

दिवाळीच्या निमित्ताने प्रथमच गृह मंत्री येत असल्याने पोलिसांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. गृहमंत्र्यांनी येथील पोलिसांशी संवाद साधला.

गंजलेल्या तोफेतून आलेल्या गोळ्यांना उत्तर द्यायचं नसतं; जयंत पाटलांची राणेंवर टीका

संभ्रम निर्माण करणं हा त्यांचा नेहमीचा धंदा आहे, असं सांगतानाच येत्या दोन महिन्यात आपलेच सरकार येणार असं ते हे सरकार आल्यापासून सांगत आहेत. आज आम्ही एक वर्षही पूर्ण केलंय.

स्वतःला विषारी इंजेक्शन टोचून घेऊन डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या !

डॉ. शीतल आमटे या बाबा आमटे यांची नात आणि विकास आमटे यांची कन्या आहे. संपूर्ण आनंदवनाची जबाबदारी शीतल आमटे यांच्यावर होती.

उद्या मतदान, यंत्रणा सुसज्ज मतदानासाठी पथके केंद्रावर रवाना

शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी 1 डिसेंबरला सकाळी 8 ते सायंकाळी पाचपर्यंत मतदान होणार आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल

नागपूर- मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग विदर्भातील चार जिल्ह्यातून जात असून या महामार्गासाठी ८ हजार ३६४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे बांधकाम सोळा टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे.

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांना कोरोना पॉझिटिव्ह

संदीप जोशी यांचा वाहनचालक आणि काही स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने ते स्वतःहून क्वारंटाईन झाले होते. तेव्हा त्यांना कोरोना झाला नव्हता. त्यानंतरही कोरोनाच्या लढ्यात ते सक्रिय होते.

स्कॉलरशिप व निर्वाहभत्ता वाढीसाठी केंद्र स्तरावर प्रयत्न करणार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

सामाजिक न्यायासंदर्भात नागपूर शहर अत्यंत जागृत पार्श्वभूमी असल्याचे सांगून केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रत्येक योजनांची प्रभावी अंमलबजावणी नागपूर विभागात व्‍हावी.

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे ज्येष्ठ नेते मा. गो. वैद्य यांचं निधन

मॉरिस कॉलेजमध्ये असताना १९४३ सालापासूनच मा.गो. वैद्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते. १९४८ साली गांधीहत्येनंतर संघावर बंदी आली, त्यावेळी त्यांनी भूमिगत राहून काम केले.

एक व्रतस्थ, ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संघाच्या वैचारिक जडणघडणीत बाबुरावांचे मोठे योगदान आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ते आपल्या विचारधारेप्रती समर्पित होते.

शहीद जवान प्रदीप मांदळे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जम्मू काश्मिर मधील द्रास भागात लाईन ऑफ मेंटेनन्स करीत असताना हिम वादळामुळे हिमकडा अंगावर कोसळून जिल्ह्यातील पळसखेडा चक्का ता. सिं. राजा येथील जवान प्रदीप साहेबराव मांदळे 15 डिसेंबर रोजी शहीद झाले होते.

मृत गाईची कातडी बाळगणे गुन्हा नाही

मृत गायींची किंवा बैलांची कातडी बाळगणे हा गुन्हा नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

मेळघाटचा वीर सुपुत्र अनंतात विलीन

अचलपूर तालुक्यातील पिंपळखुटा येथील सैनिक कैलास दहिकर हे कुलू मनाली क्षेत्रात कर्तव्यावर हजर होते.

डॉ. शीतल आमटे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी दिली ही महत्वपूर्ण माहिती

डॉ. शीतल आमटे मानसिक तणावात असल्याचे आणि त्यासाठी गेल्या 6 महिन्यांपासून नागपूर येथील मानसोपचार तज्ज्ञाकडे औषधोपचार घेत असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे.

मंत्री वडेट्टीवार यांचा पासपोर्ट जप्त

माहितीनुसार वडेट्टीवार यांनी पासपोर्टसाठी मनोरा हा कायमचा पत्ता दिला होता. तिथल्या पोलिस ठाण्यातून ना हरकत दाखला घेतला होता.

भंडारा : जिल्हा रुग्णालयातील आगीत दहा नवजात बालकांचा मृत्यू

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्न युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले ड्युटीवर असलेल्या परिचारिकेने दार उघडून बघितले असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता.

भंडारा रुग्णालय दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई

आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि जिल्हा प्रशासनाशी आपण चर्चा केली असून रुग्णालयाची सेवा योग्य खबरदारी घेऊन पूर्ववत सुरु ठेवण्याचे तसेच अन्य बालकांवरील उपचार तज्ञांच्या देखरेखीखाली करण्याचे निर्देश दिले आहे.

भंडारा रुग्णालय आगप्रकरणी दोषींना कडक कारवाई

मुख्यमंत्र्यांनी भंडारा येथील भोजापूर येथे जाऊन विश्‍वनाथ आणि दीपा बेहेरे या दाम्पत्याची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.

कर्जाची मागणी म्हणजे आत्महत्येस प्रवृत करणे नव्हे

सर्वोच्च न्यायालयातील एका खटल्याचा संदर्भ देत सदर प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या 306 या कलमाची पूर्तता होत नाही असे स्पष्ट करत खंडपीठाने याचिकाकर्त्यांवर नोंदविलेला गुन्हा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत.

संस्कृत भाषा संशोधनासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आग्रही

रामटेक येथील कवि कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयात श्री. कोश्यारी यांच्या हस्ते ज्ञानयोगी डॉ. श्रीकांत जिचकार ज्ञान -स्त्रोत केंद्राचे आज लोकार्पण करण्यात आले.

गोरेवाडा येथे ‘गोंडवाना थीम पार्क’ उभारणार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नागपुरात घोषणा

विदर्भाच्या विकासाबद्दल सरकार कटिबद्ध आहे. विदर्भात महिन्याभरात चार दौरे झाले आहे. वन, जंगल या गोष्टी माझ्या आवडीच्या आहेत.

बंद दाराआडचे सांगायला मी ज्योतिषी नाही

अजूनही जीएसटीचे 35 हजार कोटी केंद्राकडून आलेले नाही. आता केंद्राची स्थिती सुधारत असली, दर आठवड्याला पैसे येत असले, तरी जेवढे पैसे यायला हवे होते, ते देत नसल्याचेही पवार म्हणाले.

सजग राहून कामे करण्याचे विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांचे यंत्रणांना निर्देश

विभागीय आयुक्त श्री. सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज अंजनगाव सुर्जी येथील कंटेनमेंट झोनला, तसेच दर्यापूर शहराला भेट दिली.

नागपूरात कमळाच्या पाकळ्यांना गळती

भाजपमधील अन्यायकारक धोरणामुळे पक्ष सोडल्याचे या पदाधिकार्‍यांचे म्हणणे आहे. वाडी नगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना, या फुटीमुळे भाजपला मोठा धक्का बसल्याचे मानला जात आहे.

सिंचन घोटाळ्यातील चार अधिकारी पुन्हा चौकशीच्या फेऱ्यात

या प्रकरणात न्यायमूर्ती रोहित देव यांनी हा निर्णय दिला. अतिरिक्त सरकारी वकील मेहरोज खान पठाण यांनी या प्रकरणी सरकारची बाजू मांडली.

अडीच हजार कोटींचे खोटे व्यवहार

11 पैकी 10 कंपन्या दिल्ली-एनसीआर येथील आहेत. या कंपन्यांनी नाशिक आणि धुळ्यातील कंपनीला पुरवठा केल्याचे दाखवून आर्थिक गैरव्यवहार केला.

नायब तहसीलदारपदी निवड होऊनही मजुरीची वेळ

प्रवीण कोटकर असे या तरुणाचे नाव असून, त्याने लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्याची नायब तहसीलदार म्हणून निवड झाली; मात्र निवड होऊन दहा महिने झाले, तरी त्याला अद्याप नियुक्तीपत्र मिळालेले नाही.

फडणवीस यांना हप्तेखोरीचा मोठा अनुभवः पटोले

पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांच्या आरोपांवर पलटवार केला. वसुली कशी करतात? वसुलीतील वाटा किती असतो? आणि त्याचे वाटप कसे केले जाते? याचा दांडगा अनुभव फडणवीस यांना आहे.

वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांची गोळ्या झाडून आत्महत्या

दीपाली यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे अपर मुख्य प्रधान सरंक्षक रेड्डी यांच्या नावे ही सुसाईड नोट लिहिली आहे. यात वरिष्ठ अधिकारी जिल्हा वनाधिकारी विनोद शिवकुमार यांनी मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

सॅनिटायझर पिल्याने पाच जणांचा मृत्यू

दारूचे व्यसन जडलेल्या काही जणांनी तलफ भागविण्यासाठी सॅनिटायझर प्यायले. यात पाच जणांचा मृत्यू झाला.

दोन नक्षलवाद्यांना पोलिसांकडून कंठस्नान

ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये महिलांचा समावेश आहे का, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

कोविड सेंटरमधील डॉक्टरांचे सामूहिक राजीनामे आंदोलन

जवळपास 13 खासगी कोविड रुग्णालयाच्या डॉक्टरांनी पालकमंत्र्याकडे राजीनामे दिले आहेत.

एका कुख्यात गुंडाची भर दिवसा हत्या

कोरोना महामारीच्या संकटात एकीकडे शेकडो नागरिकांचा बळी जात असताना हत्येच्या या घटनेने नागपूर हादरले आहे.

नागपूरात लसीच्या ड्राईव्ह इन लसीकरणाला प्रारंभ

सदर लसीकरणासाठी जेष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक राहणार आहे.

रुग्णालयाच्या रॅम्पवरून कोसळून रुग्णाचा मृत्यू

रुग्णालयातील स्ट्रेचर साठीच्या रॅम्पवरून चालत जात असताना त्याचा पाय घसरला

‘मिहान’मध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी नवी दिल्ली, मुंबई येथे उद्योग संमेलन

मिहान संदर्भात दर पंधरा दिवसानंतर पाठपुरावा बैठक लावण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

भाजपचे माजी आमदार उद्या काँग्रेसमध्ये दाखल होणार

अमरावतीत पटोले आणि देखमुख यांच्यात चर्चा झाली. या चर्चेत देशमुख यांची घरवापसी निश्‍चित केली.

पाच जणांचा खून करून कुटुंबप्रमुखाची आत्महत्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे आरोपी आलोक मातूरकर टेलरिंगचा व्यवसाय करायचा. तो राहत्या घरातूनच त्याचा व्यवसाय चालवत होता.

काँग्रेसच्या मंत्र्यावर गैरव्यवहाराचा प्रदेशाध्यक्षांचा आरोप

शहरातील वकील तरुण परमार यांनी ही तक्रार केली असून अधिकाऱ्यांच्या संगनमताने गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

शालेय शिक्षणमंत्री गायकवाड अपघातातून थोडक्यात बचावल्या

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आज थोडक्यात बचावल्या आहेत. गायकवाड यांच्या गाडीच्या मागच्या बाजूला घासले गेले आहे

जनरेटरमधील गॅस गळतीमुळे एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

रात्री झोपताना घरात लावलेल्या जनरेटर संचाच्या धुराने गुदमरून कुटुंबातील 7 पैकी 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

आ. अमोल मिटकरी यांना भाषण करताना अर्धागवायूचा झटका

मिटकरी यांना अर्धांगवायूचा सौम्य झटका आला होता. त्यामुळे कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला.

More News