All News

  • Sunday,Oct 13

कुस्ती संघटनेचा राज्याचा मी अध्यक्ष आणि मुख्यमंत्री म्हणतात पैलवान आमच्याकडे नाही - शदर पवार

चाळीसगाव दि. १३ ऑक्टोबर - मुख्यमंत्री सांगतात आमचे पैलवान तेल लावून कुस्तीसाठी तयार आहेत. परंतु कुस्तीचा राज्यातील संघटनेचा अध्यक्ष मी आहे आणि ते म्हणतात आमच्याकडे पैलवान नाही आम्ही कुणाशी पण कुस्ती खेळत नाही आणि तुम्ही त्या भानगडीत पडूच नका अशी जोरदार उपरोधिक कोपरखळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी चाळीसगाव येथील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांना लगावली.

  • Thursday,Oct 10

आताच्या निवडणुका ही भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक घडी बसवण्याची शेवटची संधी - जयंत पाटील

चाळीसगाव दि. १० ऑक्टोबर - आताच्या निवडणुका ही भारताची आणि महाराष्ट्राची आर्थिक घडी बसवण्याची शेवटची संधी असेल. अन्यथा महाराष्ट्राची आर्थिक दुर्दशा झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आघाडीच्या प्रत्येक उमेदवाराला भरघोस मतदान करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी चाळीसगाव येथील जाहीर सभेत केले.