IMG-LOGO
महाराष्ट्र

पिंपरी चिंचवडमध्ये ऑनलाइन गेमच्या आहारी गेलेल्या दहावीतील मुलाची आत्महत्या

Tuesday, Jul 30
IMG

मुलाच्या घरातून एक कथित सुसाईड नोड सापडली आहे. त्यात त्याने 'लॉग आऊट' असं लिहून ठेवलं होतं.

पुणे, दि. ३० : पुण्याजवळील पिंपरी चिंचवड शहरात 16 वर्षाच्या मुलाने 14 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. यामुळे आईवडिलांना मोठा धक्का बसला.  पोलिसांना मुलाने लिहिलेली डायरी सापडली. पिंपरी चिंचवड पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली. आमच्या मुलाला ऑनलाईन गेमिंगचं व्यसन जडलं होतं, अशी माहिती मुलाच्या पालकांनी पोलिसांना दिली.आम्हाला मुलाच्या घरातून एक कथित सुसाईड नोड सापडली आहे. त्यात त्याने 'लॉग आऊट' असं लिहून ठेवलं होतं. अल्पवयीन मुलाने नोटमध्ये एक्सडी असेदेखील लिहिले होते. हा कोणतातरी ऑनलाईन गेम्स संदर्भातील शब्द असावा, जो गेम हा मुलगा खेळत होता. गुरुवारी मध्यरात्री अल्पवयीन मुलाने आपल्या आयुष्याचा प्रवास संपवला. हा मुलगा एका स्थानिक शाळेत दहावीमध्ये शिकत होता. त्याचे वडील एका नायझेरियन कंपनीत काम करतात तर आई एक इंजिनीअर तसेच गृहिणी आहे. पोलिसांनी अल्पवयीन मुलाचा लॅपटॉप जप्त केलाय. या लॅपटॉपचा पासवर्ड मिळवण्यासाठी पोलीस सायबर तज्ञांची मदत घेत आहेत. 

Share: