IMG-LOGO
शिक्षण

दहावीची परीक्षा ३ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान तर बारावीची 'या' तारखेपासून होणार सुरू

Tuesday, Aug 13
IMG

यंदाच्या वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा लवकर होणार आहे. दहावीची परीक्षा 3 फेब्रुवारी ते 17 मार्च या दरम्यान घेतली जाणार आहे.

पुणे, दि. १३ :  राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी बारावीचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यानुसार यंदाच्या वर्षी दहावी-बारावीच्या परीक्षा लवकर होणार आहे. दहावीची परीक्षा 3 फेब्रुवारी ते 17 मार्च या दरम्यान घेतली जाणार आहे. तर बारावीची परीक्षा ही 1 फेब्रुवारीपासून ते 18 मार्चपर्यंत घेतली जाणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक लवकरच बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट, mahasscboard.in वर उपलब्ध होईल. शाळांना परीक्षेच्या वेळापत्रकाबाबत काही सूचना देण्यासाठी 23 ऑगस्टपर्यंत वेळ देण्यात आली आहे. दहावी बारावीच्या परीक्षांची एवढ्या लवकर घोषणा करण्याची बोर्डाची ही पहिलीच वेळ आहे.दहावी-बारावीचं वेळापत्रक असे दहावी लेखी परीक्षा- 21 फेब्रुवारी ते 17 मार्चदहावी प्रॅक्टिकल परीक्षा- 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारीबारावी लेखी परीक्षा- 11 फेब्रुवारी ते 18 मार्चबारावी प्रॅक्टिकल परीक्षा- जानेवारीत सुरु होणार

Share: