वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून सध्या राजकीय वाद सुरू झाला आहे.
मुंबई, दि.१६ : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बाबत अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं आहे. राहुल गांधी यांची जीभ कापणाऱ्याला मी ११ लाख रुपये देईन, असं गायकवाड यांनी जाहीर केलं आहे. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यावरून सध्या राजकीय वाद सुरू झाला आहे.'राहुल गांधी यांचं वक्तव्य हा जनतेचा सर्वात मोठा विश्वासघात आहे. राहुल गांधी हे संविधानाचं पुस्तक दाखवून भाजप ते बदलून टाकेल असं खोटं नरेटिव्ह पसरवतात. पण प्रत्यक्षात देशाला ४०० वर्षे मागे नेण्याची काँग्रेसची योजना आहे. मराठा, धनगर आणि ओबीसी सारखे समाज इथं आरक्षणासाठी लढत आहेत, पण ते देण्याऐवजी राहुल गांधी त्यांचे आरक्षणाचे लाभ संपवण्याची भाषा करत आहेत. त्यांची जीभ कापणाऱ्याला मी ११ लाख रुपये बक्षीस देईन, असं संजय गायकवाड म्हणाले.