IMG-LOGO
राष्ट्रीय

राज्यसभेवर १२ उमेदवारांची बिनविरोध निवड; एनडीएने गाठला बहुमताचा आकडा

Wednesday, Aug 28
IMG

राज्यसभेचे २३७ सदस्य आहेत. त्यानुसार बहुमतासाठी ११९ सदस्य असणे आवश्यक आहे.

दिल्ली, दि. २८ : नुकताच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत १२ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. यापैकी भाजपाचे नऊ, तर भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या अजित पवार गट एक, राष्ट्रीय लोकमंचचा एक आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. त्यामुळे आता राज्यसभेत एडीएच्या सदस्यांची संख्या ११२ वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे या संख्येसह एनडीएला आता राज्यसभेत बहुमत प्राप्त झाले आहे.नऊ सदस्य निवडून आल्यानंतर आता राज्यसभेत भाजपाच्या सदस्यांची संख्या ९६ वर पोहोचली आहे. तर विरोधकांची एकूण संख्या ८५ वर आली आहे. राज्यसभेच्या एकूण २४५ जागा आहेत. त्यापैकी आठ जागा रिक्त आहेत. त्यामध्ये जम्मू काश्मीरमधील चार आणि राष्ट्रपती नियुक्त चार जागांचा समावेश आहे. आहेत. त्यामुळे सद्यस्थिती राज्यसभेचे २३७ सदस्य आहेत. त्यानुसार बहुमतासाठी ११९ सदस्य असणे आवश्यक आहे.

Share: