IMG-LOGO
राष्ट्रीय

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात निपाह व्हायरसचे १७५ संशयित रुग्ण

Monday, Sep 16
IMG

नुकत्याच झालेल्या निपाह प्रकरणाच्या संपर्कात आलेल्या १७५ जणांपैकी ७४ जण आरोग्य कर्मचारी आहेत.

मलप्पुरम, दि. १६  : केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, मलप्पुरम जिल्ह्यातील १७५ लोकांना निपाह विषाणूच्या उद्रेकाशी संबंधित संपर्क यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या निपाह प्रकरणाच्या संपर्कात आलेल्या १७५ जणांपैकी ७४ जण आरोग्य कर्मचारी आहेत. प्राथमिक संपर्क यादीत १२६ जण असून त्यापैकी १०४ जण अतिजोखमीचे मानले जात आहेत. इतर ४९ जणांना दुय्यम संपर्कांतर्गत वर्गीकृत करण्यात आले आहे. या यादीतील दहा जणांवर सध्या मांजरी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १३ जणांची चाचणी करण्यात येत असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Share: