कोणता पक्ष किती जागांवर लढणार याचा निर्णय उद्याच्या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाणार आहे.
मुंबई, दि. २० : महाविकास आघाडीच्या गोटातून महत्वाची बातमी समोर आली आहे. सोमवारी (दि.२१ ) महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत जागावाटप जाहीर होणार आहे. कोणता पक्ष किती जागांवर लढणार याचा निर्णय उद्याच्या पत्रकार परिषदेत जाहीर केला जाणार आहे. आमचं सगळं ठरलं आहे. त्यामुळं उद्या जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी दिली.