मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी राजभवनकडे निघालेल्या मोर्चेकरी विद्यार्थ्यांची सुरक्षा दलांबरोबर चकमक झडली.
मणिपूर, दि. ११ : मध्ये मंगळवारी विद्यार्थ्यांनी राजभवनावर काढलेल्या मोर्चाहा हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रुधुराचा मारा केला. यात किमान ४० विद्यार्थी जखमी झाले आहेत. दुसरीकडे कंगपोकी जिल्ह्यात दोन सशस्त्र गटांमधील गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आल्याने तणावात भर पडली आहे. थंगबु या दुर्गम खेड्यात जमावाने काही घरे जाळल्याने ग्रामस्थांनी गावाबाहेर पळ काढावा लागला आहे. दरम्यान हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तीन जिल्ह्यांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.