IMG-LOGO
महाराष्ट्र

मुंबई-पुणे मार्गावर ५० टक्के ट्रॅफिक होणार कमी ; नितीन गडकरींनी सांगितला प्लान

Sunday, Sep 15
IMG

गडकरी यांनी आपल्या आगामी प्रकल्पांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

पुणे, दि. १५:  येत्या २५ वर्षांत सर्व वाहने जीवाश्म इंधनावर नाही तर विजेवर चालतील. आपले तंत्रज्ञान खूप फायदेशीर आहे. शिवाय कचऱ्याचा वापर आपण रस्ते बांधण्यासाठी करू शकतो असं ही ते म्हणाले.  पुण्यातील कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या आगामी प्रकल्पांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढच्या पाच वर्षात तुम्हाला डिझेल गाड्या दिसणारच नाहीत तर शंभर टक्के इलेक्ट्रिक बसेस दिसतील. मला विश्वास आहे, इंजिनियरचं संशोधन फार महत्त्वाचं आहे. आम्ही भविष्यात नक्कीच अमेरिकेच्याही पुढे जावू, असा मला विश्वास आहे. त्याचबरोबर अटल सेतू जवळून १४ पदरी रस्ता तयार होणार आहे. मुंबईहून बेंगळुरूला जाणारा हा रस्ता पुण्यातील रिंग रोड मार्गे तयार केला जाणार आहे. या रस्त्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक ५० टक्क्यांनी कमी होणार असल्याचंही नितीन गडकरी यांनी सांगितलं.

Share: