IMG-LOGO
राष्ट्रीय

दिल्लीत ५२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद

Thursday, May 30
IMG

दिल्लीतल्या सफदरजंगच्या बेस स्टेशनवर कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले

दिल्ली, दि. ३० : दिल्लीतल्या मुंगेशपूर हवामान केंद्राने गुरुवारी दुपारी २.३० वाजता ५२.३ अंश सेल्सियस तापमानाची नोंद केली आहे. दिल्लीतल्या या तापमानामुळे आजचा दिवस हा सर्वात उष्ण दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. दुपारी ४ नंतर दिल्लीतल्या काही भागांमध्ये हलका पाऊसही झाला. दिल्लीतलं हे आजवरचं उच्चांकी तापमान आहे. देशातलं सध्याच्या घडीचं सर्वात उच्चांकी तापमान दिल्लीत नोंदवलं गेलं आहे.दिल्लीतल्या सफदरजंगच्या बेस स्टेशनवर कमाल तापमान ४५.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले, जे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वोच्च तापमान आहे. मे २०२० मध्ये सर्वोच्च तापमान ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. 

Share: