या ठिकाणी तब्बल १६ लाख लोकांची गर्दी जमली होती. हा शो सकाळी ११ वाजता सुरु झाला होता.
चेन्नई , दि. ७ : भारतीय हवाई दलाच्या ९२ व्या वर्धापन दिनानिमित्त चेन्नईमध्ये एका एअर शोचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या शो दरम्यान डिहायड्रेशनमुळे पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तसेच तब्बल २३० जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेत श्रीनिवासन (४८,रा.पेरुंगलाथूर), कार्तिकेयन (३४) तिरुवोट्टीयुर आणि जॉन (५६) रा.कोरुकुपेट अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावे असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, भारतीय हवाई दलाच्या या एअर शोचा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये समावेश करण्यात येणार होता. हा शो पाहण्यासाठी या ठिकाणी तब्बल १६ लाख लोकांची गर्दी जमली होती. हा शो सकाळी ११ वाजता सुरु झाला होता. त्यानंतर दोन तास हा शो सुरु होता. मात्र, हा कार्यक्रम पाहण्यासाठी सकाळी ८ वाजल्यापासूनच लोक चेन्नईमधील मरीना बीचवर जमले होते.