सात राज्यांमधील ५७ मतदारसंघांमध्ये शनिवारी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली.
दिल्ली, दि. २ : लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व अखेरच्या टप्प्यात शनिवारी ६०.३७ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक ७०.०३ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. सात राज्यांमधील ५७ मतदारसंघांमध्ये शनिवारी सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून निवडणुकीस उभे असून या मतदारसंघात ५६.३५ टक्के मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तुरळक घटना सोडल्यानंतर सर्व राज्यांत शांततेत मतदान झाल्याचे आयोगाने सांगितले. ओडिशा राज्याच्या विधानसभेच्या उर्वरित ४२ मतदारसंघातही मतदान झाले. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी मंगळवार, ४ जून रोजी होणार आहे.