या ९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीत १३ महिला उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे.
मुंबई, दि. २० : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी भारतीय जनता पक्षाने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या ९९ विधानसभा जागांपैकी मुंबई, ठाणे आणि कल्याण विभागातील सुमारे २० जागांसाठी उमेदवार जाहीर करण्यात आले. मुंबई शहर आणि उपनगरात विधानसभेच्या एकूण ३६ जागा आहेत. मुंबईतील भाजपच्या १६ आमदारांपैकी पक्षाने पहिल्या यादीत १४ आमदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.मुंबईत भाजपने वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपले मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे, तर त्यांचे बंधू विनोद शेलार मालाड पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. या ९९ उमेदवारांच्या पहिल्या यादीत १३ महिला उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. त्यात नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून सीमा हिरे पुन्हा संधी आजमावणार असून नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातून मात्र प्रा. देवयानी फरांदे यांना पहिल्या यादीत स्थान मिळालेले नाही. भाजच्या पहिल्या यादीत १३ महिलांचा समावेश१) श्रीजया अशोक चव्हाण - भोकर विधानसभा मतदार संघ२) अनराधा अतुल चव्हाण - फुलंब्री विधानसभा मतदार संघ३) सीमा महेश हिरे - नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघ४) सुलभा गायकवाड - कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघ५) मंदा विजय म्हात्रे - बेलापूर विधानसभा मतदार संघ६) मनीषा अशोक चौधरी - दहिसर विधानसभा मतदार संघ७) विद्या ठाकूर- गोरेगांव विधानसभा मतदार संघ८) माधुरी सतीश मिसाळ - पर्वती विधानसभा मतदार संघ९) मोनिका राजीव राजले - शेगाव विधानसभा मतदार संघ१०) प्रतिभा पचपुते - श्रीगोंदा विधानसभा मतदार संघ११) नमिता मुंदडा - केज विधानसभा मतदार संघ१२) श्वेता महाले - चिखली विधानसभा मतदार संघ१३) मेघना बोर्डीकर - जिंतूर विधानसभा मतदार संघ