IMG-LOGO
राष्ट्रीय

आतिशी या केजरीवाल यांच्यासाठी रामायणातील भरताच्या भूमिकेत; मुख्यमंत्र्यानी घेतली श्भ्ध

Monday, Sep 23
IMG

दिल्लीचा कारभार सांभाळणार असल्याचं आतिशी यांनी पदभार स्वीकारतांना म्हटलं.

दिल्ली, दि. २३ : दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री आतिशी यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पदभार स्वीकारला आहे. मात्र, यावेळी आतिशी या केजरीवाल यांच्यासाठी रामायणातील भरताच्या भूमिकेत दिसल्या. मुख्यमंत्री कार्यालयात अरविंद केजरीवाल यांच्या खुर्चीशेजारी दुसरी खुर्ची ठेवून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. दिल्लीतील लोक जोपर्यंत त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास दाखवत नाहीत तोपर्यंत ती अरविंद केजरीवाल यांच्या खुर्चीवर बसणार नाही, असे त्यांनी पदभार देतांना स्पष्ट केलं. पुढील चार महिन्यासाठी त्या दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहणार आहेत. असे असले तरी आतिशी या रामायणातील भरताच्या भूमिकेत दिसणार आहे. ज्या प्रमाणे भरताने प्रभू रामाचे जोडे राज सिंहासनावर ठेवत १४ वर्षे राज्य कारभार सांभाळला, त्याचप्रमाणे मी पुढील चार महिने दिल्लीचा कारभार सांभाळणार असल्याचं आतिशी यांनी पदभार स्वीकारतांना म्हटलं.

Share: