आलीशान मोटारीने कोरेगाव पार्क येथील गूगल बिल्डिंगसमोर दोन दुचाकींना धडक दिली.
पुणे, दि. ११ : पुण्यात हीट अँड रनच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाही आहे. मे महिन्यात एका मद्यधुंद बिल्डर पुत्राने अलिशाल पोर्शेने दोघांना चिरडले होते. या घटनेनंतर पुन्हा गुरुवारी रात्री एका आलीशान मोटारीने कोरेगाव पार्क येथील गूगल बिल्डिंगसमोर दोन दुचाकींना धडक दिली असून यात एका डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे. तर तिघे जखमी झाले आहे. घटनेनंतर आरोपी हा फरार झाला असून पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन त्याला करसह अटक केली आहे. ही घटना रात्री १ ते १.३० च्या सुमारास घडली. रौफ अकबर शेख असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणांचे नाव आहे. तर आयुष प्रदीप तयाल (वय ३४, रा. हडपसर) असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी त्याच्या घरून अटक केली आहे.