IMG-LOGO
महाराष्ट्र

निवृत्त शिक्षकाने गळफास घेत संपूर्ण कुटुंबासह केली सामूहिक आत्महत्या

Wednesday, Oct 02
IMG

तीन मृत व्यक्तींचे हात पाय बांधलेले आढळले असल्याने घातपात झाल्याची शक्यता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नागपूर, दि. २ : येथील नरखेड तालुक्यातील मोवाड येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथील सेवानिवृत्त शिक्षकाने कुटुंबातील चौघांसह गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून शवविच्छेदनासाठी ते दवाखान्यात पाठवण्यात आले आहेत. या सर्वांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. दरम्यान, तीन मृत व्यक्तींचे हात पाय बांधलेले आढळले असल्याने घातपात झाल्याची शक्यता देखील पोलिसांनी व्यक्त केली आहे. विजय पचोरी असे सेवानिवृत शिक्षकाचे नाव आहे. तर पत्नी बालाबाई पचोरी, गणेश पचोरी, दीपक पचोरी असे इतर मृतकांची नावे आहेत. या सर्वांनी गळफास घेतला. तिघांचे हात पाय बांधले असल्याने पित्याने त्यांची हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची शक्यता देखील पोलिसांनी वर्तवली आहे.

Share: