IMG-LOGO
नाशिक शहर

बांगलादेशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंदला गालबोट; नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता

Friday, Aug 16
IMG

जखमी झालेल्यांची मंत्री गिरीश महाजन, आ. देवयानी फरांदे यांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट घेतली.

नाशिक, दि. १६ : बांगलादेशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी शहरात सकल हिंदू समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या बंदला भद्रकाली, जुने नाशिक परिसरात हिंसक वळण लागल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना अश्रुधूर तसेच लाठीमार करावा लागला. मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त वाढविण्यात आल्याने सायंकाळी परिसरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली.बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे सकाळपासून नाशिकमधील सर्व बाजार बंद आहेत. हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती.  भद्रकाली, जुने नाशिक परिसरात दगडफेक सुरु असतानाही काही जणांनी दुपारी मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्याचा प्रयत्न केला बंदवेळी दोन जमावांनी रस्त्यावर एकत्र येत मेनरोड परिसर आणि पिंपळ चौकात दगडफेक केली. यात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने मोठं नुकसान झालं आहे.. या दगडफेकीत १० पेक्षा अधिक अधिकारी, कर्मचारी जखमी झाले. शालिमारसह जुने नाशिक परिसरातील रस्त्यांवर दगडांचा खच पडला होता. जखमी झालेल्यांची मंत्री गिरीश महाजन, आ. देवयानी फरांदे यांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट घेतली.

Share: