IMG-LOGO
मनोरंजन

अभिनेत्री हीना खानला स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान

Friday, Jun 28
IMG

हीनाने इन्स्टावर शुक्रवारी पोस्ट करत म्हटले, मला काही महत्त्वाची गोष्ट सर्वांसोबत शेअर करायची आहे.

मुंबई, दि. २८ : अभिनेत्री हीना खान स्तनाच्या कर्करोगाशी झुंज देत आहे. हीना खान  सध्या 'ब्रेस्ट कॅन्सर' म्हणजे 'स्तनाच्या कर्करोगाने' त्रस्त आहे. हिनाने शुक्रवारी तिच्या इंस्टाग्राम हँडलवर ही माहिती शेअर केली.हीनाने इन्स्टावर शुक्रवारी पोस्ट करत म्हटले, मला काही महत्त्वाची गोष्ट सर्वांसोबत शेअर करायची आहे. मला स्टेज थ्री ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. ही आव्हानात्मक परिस्थिती असूनही, मी सर्वाना आश्वस्त करू इच्छितो की मी ठीक आहे. (#HinaKhanBreastCancer) मी मजबूत, दृढनिश्चय आणि या आजारावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे. माझे उपचार आधीच सुरू झाले आहेत. यातून आणखी मजबूत होण्यासाठी मी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे. दरम्यान या गंभीर आजाराबाबत हीनाने मार्चमध्ये चाहत्यांना या गंभीर आजाराची कल्पना दिली होती.  

Share: