हैदराबादमध्ये पाच ड्रग्ज डिलर्सना अटक केली आहे. ड्रग्ज डिलिंगमधील मुख्य आरोपी नायजेरिचा आहे.
हैदराबाद, दि. २१ : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहच्या भावाला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आलीय. अमन प्रताप सिंह असं रकुलच्या भावाचं नाव आहे. हैदराबाद पोलिसांनी अमनसह चार जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली. तेलंगना एन्टी नारकोटिक्स विभागानं त्यांच्याकडून जवळपास 2.6 किलो ग्रॅम कोकेन जप्त केलं आहे. हे कोकेन विक्रीसाठी हैदराबादमध्ये आणण्यात आलं होतं, अशी माहिती आहे. पोलिसांनी अमन प्रीत सिंहसह १३ ड्रग्ज डिलर्सची नावं सांगितली आहेत. त्यापैकी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तेलंगना अँटी नारकोटिक्स ब्युरो, डेप्युटी पोलीस आयुक्त, सायबराबाद पोलिसांनी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. त्यांनी हैदराबादमध्ये पाच ड्रग्ज डिलर्सना अटक केली आहे. ड्रग्ज डिलिंगमधील मुख्य आरोपी नायजेरिचा आहे. ओनुओहा ब्लेसिंग हे त्याचं नाव आहे. हा बंगळुरुमधील हेअर स्टायलिस्ट आहे. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत.