IMG-LOGO
महाराष्ट्र

सिंचन घोटाळ्यावरून अजित पवारांना १० वर्षे ब्लॅकमेल; जयंत पाटलांचा दावा

Saturday, Nov 02
IMG

तुम्ही विरोधी पक्षात असताना अजित पवारांवर आरोप केले आणि सत्तेत आल्यानंतर त्यांची चौकशी केली.

मुंबई, दि. २ :  सांगलीच्या तासगावमध्ये झालेल्या एका सभेत कथित सिंचन घोटाळ्यासंदर्भात माजी गृहमंत्री दिवंगत आर.आर.पाटील यांच्याबाबत भाष्य केलं. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अजित पवारांवर टीकेची झोड उठवली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांवर निशाणा साधला आहे. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी (एसपी) एक महत्त्वाची परीक्षा आहे. कारण पक्षात झालेल्या फुटीनंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. आता या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुलाखतीत भाष्य केलं आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून असलेले मतभेत, मराठा आंदोलन आणि अजित पवारांच्या कथित सिंचन घोटाळ्यावरील विधानांवरही जयंत पाटील यांनी भाष्य भाष्य केलं आहे.जयंत पाटील यांनी भाष्य करताना म्हटलं की, अजित पवारांनी हे बोलून देवेंद्र फडणवीस यांना आणखी अडचणीत आणलं आहे. त्यातून फडणवीस यांची कार्यशैली तसेच गेल्या दहा वर्षांतील दोघांचे संबंधही समोर आले. त्यात भर म्हणजे अजित पवार यांनी आर आर पाटील यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मतदारांमध्ये अधिक संताप निर्माण झाला. त्यांनी विरोधी पक्षनेत्यांना फाईल दाखवली असती तर समजू शकलो असतो. पण ते (अजित पवार) फक्त विरोधी आमदार होते. तसेच तुम्ही विरोधी पक्षात असताना अजित पवारांवर आरोप केले आणि सत्तेत आल्यानंतर त्यांची चौकशी केली.

Share: