स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल, तो आम्ही मान्य करू.”
पुणे, दि. १७ : पुण्यामध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत असताना अजित पवारांना जय पवार यांच्या उमेदवारीबाबत कार्यकर्ते मागणी करत आहेत, असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी या प्रश्नाचे उत्तर देत असताना ते म्हणाले, “शेवटी लोकशाही आहे. मला तरी निवडणूक लढण्यात रस नाही. मी तिथे सात-आठ वेळा निवडणुकीला उभा राहिलो आहे. जनतेचा कौल असेल त्याप्रमाणे आमच्या पक्षाचे संसदीय समिती त्याचा निर्णय घेईल. स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल, तो आम्ही मान्य करू.” दोन दिवसांपूर्वीच अजित पवार यांनी लोकसभा निवडणुकीबाबत आश्चर्यकारक विधान केले होते. ते म्हणाले, “लोकसभा निवडणुकीच्या वेळी माझ्याकडून थोडी चूक झाली. मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते. पण त्यावेळेस तसे झाले. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता. आता जे झाले ते झाले, बाण सुटलेला आहे. आज मला माझे मन सांगते की तसे व्हायला नको होते.”