IMG-LOGO
राष्ट्रीय

Bjp manifesto : ज्येष्ठ महिलांना 'मां सन्मान योजने'अंतर्गत दरवर्षी १८ हजार रुपये

Saturday, Sep 07
IMG

जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा २५ कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला.

दिल्ली, दि. ७ :  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी  भाजपचा २५ कलमी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये प्रत्येक कुटूंबातील ज्येष्ठ महिलेला प्रतिवर्षी १८००० हजार रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी अमित शहा यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्याचाही उल्लेख करत कलम ३७० इतिहासजमा झाले असून, आता कधीही परत येऊ शकणार नाही आणि आम्ही ते परत येऊ देणार नाही, असे ठणकावून सांगितले.  केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाने आगामी जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा शुक्रवारी जाहीर केला. जम्मू-काश्मीरमध्ये सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ महिलेला 'मां सन्मान योजने'अंतर्गत दरवर्षी १८ हजार रुपये देण्याचे आश्वासन भाजपने दिले आहे. प्रगती शिक्षा योजनेअंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता म्हणून दरवर्षी तीन हजार रुपये देण्यात येणार आहेत.जाहीरनामा प्रसिद्ध करताना अमित शहा म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीरचा मुद्दा आमच्या पक्षासाठी महत्त्वाचा राहिला आहे आणि आम्ही नेहमीच हा प्रदेश भारतासोबत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पंडित प्रेमनाथ डोगरा यांच्या संघर्षापासून ते श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या बलिदानापर्यंत हा लढा आधी जनसंघाने आणि नंतर भाजपने पुढे नेला कारण जम्मू-काश्मीर हा नेहमीच भारताचा भाग राहिला आहे आणि राहील, असा आमचा विश्वास आहे. यावेळी जम्मू-काश्मीर भाजपचे अध्यक्ष रवींद्र रैना आणि पक्षाचे इतर नेते उपस्थित होते.

Share: