IMG-LOGO
महाराष्ट्र विधानसभा २०२४

Maharashtra Vidhansabha Election 2024 : मनसेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहीममधून अमित ठाकरे रिंगणात

Tuesday, Oct 22
IMG

दिवंगत रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश रमेश वांजळे यांना खडकवासलामधून तिकीट देण्यात आले आहे.

मुंबई, दि. २२  :  मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज ४५ उमेदवारांची दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरत असून त्यांना माहिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर राज ठाकरेंनी पुतण्या आदित्य ठाकरेंविरोधात वरळी मतदारसंघात संदीप देशपांडे यांनी तिकीट दिले आहे. दिवंगत रमेश वांजळे यांचा मुलगा मयुरेश रमेश वांजळे यांना खडकवासलामधून तिकीट देण्यात आले आहे.४५ जणांची यादी अशीराजू पाटील (कल्याण ग्रामीण), अमित राज ठाकरे (माहिम), शिरीष सावंत (भांडूप पश्चिम), संदीप देशपांडे (वरळी), अविनाश जाधव (ठाणे शहर), संगीता चेंदवणकर (मुरबाड), किशोर शिंदे (कोथरुड), साईनाथ बाबर (हडपसर), मयुरेश रमेश वांजळे (खडकवासला), नयन कदम (मागाठणे), कुणाल माईणकर (बोरिवली), राजेश येरुणकर (दहिसर), भास्कर परब (दिंडोशी), संदेश देसाई (वर्सोवा) महेश फरकासे (कांदिवली पूर्व), विरेंद्र जाधव (गोरेगाव), दिनेश साळवी (चारकोप), भालचंद्र अंबुरे (जोगेश्वरी पूर्व), विश्वजित ढोलम (विक्रोळी), गणेश चुक्कल (घाटकोपर पश्चिम), संदीप कुलथे (घाटकोपर पूर्व), माऊली थोरवे (चेंबूर), महेंद्र भानुशाली (चांदिवली), जगदीश खांडेकर (मानखुर्द शिवाजीनगर), निलेश बाणखेले (ऐरोली), गजानन काळे (बेलापूर), सुशांत सूर्यराव (मुंब्रा कळवा), विनोद मोरे (नालासोपारा), मनोज गुळवी (भिवंडी पश्चिम), संदीप राणे (मीरा भाईंदर), हरिश्चंद्र खांडवी (शहापूर), प्रमोद गांधी (गुहागर), रविंद्र कोठारी (कर्जत जामखेड), कैलास दरेकर (आष्टी), मयुरी बाळासाहेब म्हस्के (गेवराई), शिवकुमार नागराळे (औसा), अनुज पाटील (जळगाव शहर), प्रवीण सूर (वरोरा), महादेव कोनगुरे (सोलापूर दक्षिण), रोहन निर्मळ (कागल), वैभव कुलकर्णी(तासगाव कवठे महांकाळ), संजय शेळके (श्रीगोंदा), विजयराम किनकर (हिंगणा), आदित्य दुरुगकर (नागपूर दक्षिण), परशुराम इंगळे (सोलापूर शहर उत्तर मतदारसंघ)

Share: