या प्रकरणातील आरोपी विजय नावाच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे.
कृष्णा, दि. ३० : आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील एसआर गुडलावल्लेरु अभियांत्रिकी महाविद्यालयात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या महाविद्यालयाच्या आवारात असलेल्या मुलींच्या वसतिगृहाच्या स्वच्छतागृहात 'छुपा कॅमेरा' लावलेला आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून महाविद्यालयाच्या आवारात विद्यार्थीनींद्वारे जोरदार निदर्शने करण्यात येत आहे. दरम्यान, छुप्या कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड करण्यात आलेले अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले असल्याचा आरोप विद्यार्थीनींनी केला आहे. या प्रकरणातील आरोपी विजय नावाच्या विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याचा लॅपटॉप जप्त करण्यात आला आहे. आरोपी विद्यार्थ्याच्या लॅपटॉपमधून पोलिसांनी जवळपास ३०० अश्लील व्हिडिओ जप्त केले आहे. आरोपी विजय हा याच कॉलेजमध्ये बीटेकच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. विजयने इतर विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडिओ विकले असावेत असा पोलिसांना संशय आहे.