मी केजरीवाल यांना अनेकदा म्हटलं होतं की राजकारणात जाऊ नका.
नगर, दि. १५: मी अरविंद केजरीवाल यांना राजकारणात जाण्यास मनाई केली होती. मी त्यांना आधीच म्हटलं होतं की राजकारणात नका जाऊ. त्याऐवजी समाजाची सेवा करा. जनतेची सेवा करून खूप मोठे व्हाल. आम्ही अनेक वर्षे एकत्र होतो. त्यावेळी मी केजरीवाल यांना अनेकदा म्हटलं होतं की राजकारणात जाऊ नका. समाजसेवेतूनच खरा आनंद प्राप्त होतो. परंतु, त्यांनी माझं ऐकलं नाही, त्यांना त्या गोष्टी कदाचित पटल्या नसतील. त्यामुळे आज जे व्हायचं ते झालं आहे. त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय ते मला माहिती नाही. अशी प्रतिक्रिया केजरीवाल यांचे जुने सहकारी, जनलोकपाल आंदोलनाचे प्रमुख अण्णा हजारे यांनी दिली आहे.