त्याला स्वखर्चानं पोलीस संरक्षणात उपचार घ्यावे लागणार आहेत.
जोधपूर, दि. १५ : बलात्काराच्या आरोपाखाली गेल्या ११ वर्षांपासून जोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याला अखेर दिलासा मिळाला आहे. उपचारांसाठी न्यायालयानं त्याला सात दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. ८५ वर्षीय आसारामवर महाराष्ट्रात उपचार होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आसाराम पॅरोलसाठी प्रयत्नशील होता. त्यानं अनेकदा अर्ज केले होते. त्याच्या प्रकृतीची दखल घेऊन अखेर राजस्थान उच्च न्यायालयानं त्याचा पॅरोलचा अर्ज स्वीकारला आहे. आता त्याला स्वखर्चानं पोलीस संरक्षणात उपचार घ्यावे लागणार आहेत.