६३ वर्षीय वृद्ध नागरिकाची घरात घुसून हत्या करण्यात आली होती.
मणिपूर, दि. ७ : मागील एका वर्षापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या घटानांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. अशातच शुक्रवारी कुकी सशस्र गटाकडून बिष्णुपूर जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रॉकेट हल्ला करण्यात आला. त्यानंतर आज पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचाराची घटना घडली आहे. या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कुकी सशस्र गटाने आज सकाळी पाच वाजताच्या सुमारास निंगथेम खुनौ भागात राहणाऱ्या मैतेई समाजाच्या एका ६३ वर्षीय वृद्ध नागरिकाची घरात घुसून हत्या केली होती. तसेच त्यांनी त्या परिसरात अंदाधुंद गोळीबारही केला होता. त्यानंतर दुपारी मैतेई सशस्र गटाने या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं.